

आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी यंदा १० सप्टेंबर २०२५ (मंगळवार) रोजी आली आहे. ही तिथी विशेष ठरते कारण पितृपक्षामध्ये येणारी ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी श्रीगणेशाची विधीवत पूजा, व्रत, अर्चा तसेच पितृ तर्पण व श्राद्ध करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. यामुळे श्रीगणेश आणि पितर या दोघांचंही आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील संकटं दूर होतात.
चतुर्थी तिथीची सुरुवात : १० सप्टेंबर दुपारी ३.३७ वाजता
समाप्ती : ११ सप्टेंबर दुपारी १२.४५ वाजता
उदया तिथीनुसार व्रत : १० सप्टेंबर, बुधवार
ग्रहस्थिती : सूर्य सिंह राशीत, चंद्र मीन राशीत सायं. ४.०३ पर्यंत व त्यानंतर मेष राशीत प्रवेश.
योग : वृद्धी योग व ध्रुव योग, ज्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलेलं आहे.
‘संकष्टी’ या शब्दाचा अर्थच आहे संकटं हरून टाकणारी.
या दिवशी उपवास, पूजन आणि श्रीगणेश स्तोत्र पठण केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात.
माता आपल्या संततीच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी हे व्रत करतात.
पितृपक्षात तर्पण-श्राद्ध केल्याने पितृ दोष शमतो आणि पितरांची कृपा कायम राहते.
धन, करिअर, रोग, कौटुंबिक कलह यांसारख्या समस्या दूर होतात व घरात सुख-शांती नांदते
ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करून पिवळे वस्त्र धारण करा.
घरातील पूजास्थळ स्वच्छ करून गणेशमूर्तीसमोर दूर्वा, लाल फुलं व सिंदूर अर्पण करा.
श्रीगणेशाला बुंदीचे लाडू नैवेद्य दाखवा. त्यातील ५ लाडू ब्राह्मणांना दान द्यावेत, ५ लाडू भगवानाच्या चरणी अर्पण करावेत आणि उरलेला प्रसाद म्हणून वाटावा.
श्री गणेश स्तोत्र, अथर्वशीर्ष व संकटनाशक स्तोत्राचं पठण करा.
“ॐ गं गणपतये नमः” या मंत्राचा १०८ वेळा जप करा.
संध्याकाळी गायीला दूर्वा किंवा गूळ खाऊ घालणं शुभ मानलं जातं.
रात्री चंद्राला अर्घ्य देताना मंत्र उच्चारावा :
“सिंहिका गर्भसंभूते चन्द्रमंडल सम्भवे। अर्घ्यं गृहाण शंखेन मम दोषं विनाशय॥”
शक्य असल्यास संकष्टी व्रत करणं विशेष फलदायी मानलं जातं. यामुळे ग्रहबाधा, ऋण व इतर दोष दूर होतात.
यंदा पितृपक्षात पहिल्यांदाच येणारी ही विघ्नराज संकष्टी चतुर्थी असल्याने याचं महत्त्व द्विगुणित झालं आहे. या दिवशी श्रीगणेश व पितरांची कृपा एकत्र मिळण्याची संधी लाभते.