

vastu tips things that bring bad luck negative energy home vastu dosh
पुढारी ऑनलाईन :
जीवनात आपण अनेकवेळा खूप मेहनत करतो. कष्ट घेतो मात्र म्हणावे तितके यश लाभत नाही. त्यामुळे माणूस आपल्या नशिबाला दोष देतो. चला तर मग जाणून घेऊया की, घरातील कोणत्या अशा वस्तू आहेत, ज्यामुळे आपल्या दुर्भाग्याचे कारण बनते.
प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीमधून एक प्रकारची विशेष ऊर्जा निघत असते. जर ती वस्तू नीट असेल तर त्यातून शुभ ऊर्जा निर्माण होते. जर एखादी वस्तू खराब असेल तर त्यातून निघणारी ऊर्जा ही वातावरण नकारात्मक बनवते. वास्तूशास्त्रानुसार काही छोट्या-छोट्या गोष्टींमुळे दुर्देंव निर्माण होते. जे जीवनात अडचणी निर्माण करते. चला जाणून घेऊयात वास्तूशास्त्रानुसार जीवनात कोणत्या वस्तूंमुळे दुर्देव निर्माण होते.
बंद घड्याळ...
घड्याळ हे आपल्याला जीवनात पुढे जाण्यासाठी उपयोगी ठरते. ते वेळ दर्शवणारे एक उपकरणच नाही तर या जगासोबत चालण्यासाठी मदत करणारे आणि प्रेरणा देणारे एक माध्यम आहे. ते आपल्या खराब वेळेलाही टाळू शकते. त्यामुळे घरात बंद घड्याळे चुकूनही ठेवू नका. जर तुम्ही घरात बंद घड्याळ ठेवले तर तुमचे नशीबही त्याच जागी थांबेल. तुमची खराब वेळ संपण्याचे मार्ग दिसणार नाहीत.
बंद कुलूप
वास्तूशास्त्रानुसार, कुलूप आपले नशीब उजळवू शकते तसेच कायमचे बंदही करू शकते. त्यामुळे आपल्या घरात बंद किंवा खराब झालेले कुलूप ठेवू नये. खराब किंवा नादुरूस्त कुलपामुळे आपल्या करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. लग्न होण्यातही अडचणी निर्माण होऊ शकतात.
फाटलेली चप्पल - बूट
बूट आणि चपलांचा संबंध आपल्या संघर्षाशी आहे. जीवनात संघर्ष कमी करायचा असेल तर आपले चप्पल किंवा बूट हे चांगले असणे आवश्यक आहे. वास्तूशास्त्रानुसार घरातील जुने खराब झालेले चप्पल किंवा बूट ठेवल्याने आपला जीवनातील संघर्ष वाढीव कारण ठरू शकतो. प्रत्येक पावलावर एखादे काम पूर्ण होण्यासाठी मोठे कष्ट उपसावे लागू शकतात. अशा फाटक्या किंवा खराब झालेल्या पादत्राणांना सोडणे किंवा टाकून देणे योग्य ठरते.
फाटलेले जुने कपडे...
कपड्यांचा थेट संबंध आपल्या नशिबाशी असतो. घरातील उपयोगी नसलेले किंवा खराब झालेले कपडे आयुष्यात दुर्देव आणतात. असे कपडे घरातून काढून टाकणे किंवा त्याचे दान करणे चांगले ठरते.
देव-देवतांचे जुने फोटो
देवी-देवतांची मुर्ती किंवा फोटो हे काही वेळेपर्यंत आपल्याला शुभ उर्जा देतात. यानंतर मात्र यातून नकारात्मक तरंग निघु शकतात. वास्तशास्त्रानुसार असे खराब झालेले, जुने देवतांचे फोटो, चित्रे किंवा खराब झालेल्या मुर्त्या वेळेवर बदलणे महत्वाचे असते. जुन्या खराब फोटोंचा मानसिक स्थितीवरही परिणाम होउ शकतो. त्यामुळे अशा प्रतिमा जमिनीत पुराव्यात किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करता येऊ शकतात.