

Kuber Corner In Home: वास्तूशास्त्रानुसार घरात एक कुबेराचा कोपरा असतो. हे ठिकाण सुबत्तेची देवता कुबेराची जागा मानली जाते. मान्यतेनुसार घरातील उत्तर देशाला कुबेराचा कोपरा असतो. हा कोपरा नेहमी स्वच्छ, हलका आणि टापटीप ठेवला पाहिजे. त्यामुळं घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह चांगला राहतो. त्याचबरोबर घरात सुबत्ता आणि पैशाची आवक चांगली राहते. त्यामुळं वास्तूशास्त्रानुसार घराच्या या खास कोपऱ्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असंत.
वास्तू शास्त्रानुसार उत्तर दिशेला गरजेचं नसलेलं समान, भंगार किंवा जड वस्तू ठेवू नयेत. या कोपऱ्यात अव्यवस्था राहिल तर घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह प्रभावित होतो. जर हा कोपरा सुटसुटीत, स्वच्छ आणि व्यवस्थित राहिला तर घरातील वातावरण अधिक प्रसन्न आणि सुखद राहतं.
पैशाच्या संबंधीत कागदपत्रे, तिजोरी, लॉकर घराच्या दक्षिण पश्चिम दिशेला ठेवून त्याचे तोंड हे उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले गेले आहे. तर उत्तर दिशेला कुबेर यंत्र ठेवण्याचा सल्ला वास्तू शास्त्र तज्ज्ञ देतात. मान्यतेनुसार यामुळं घरात समृद्धी आणि आर्थिक स्थीरता येते. सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहाला बळ मिळतं.
वास्तू शास्त्रानुसार उत्तर दिशेला छोटा फाऊंटन, एक्वेरियम, आरसा किंवा निळ्या, हिरव्या किंवा वांगी कलरची रंगसंगती असलेल्या शोभेच्या वस्तू ठेवणे शुभ मानले गेले आहे. याचा उद्येश हा घरातील वातावरण नियंत्रित करणे आणि ताजेपणा कायम राखणे हा आहे. फक्त या कोपऱ्यात कायम स्वच्छता ठेवा
जर घराच्या उत्तर दिशेला बाथरूम असेल तर वास्तू शास्त्राच्या दृष्टीकोणातून ही आदर्श स्थिती नाही. त्यावर उपाय म्हणून छोटा आरसा किंवा इनडोअर प्लांट ठेवावे. त्याचबरोबर या भागात जर जड वस्तू, निकामी वस्तू किंवा खूप काळापासून वापरात नसलेल्या वस्तू ठेवणे टाळावे.