Horoscope Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | बुधवार, २३ ऑक्‍टोबर २०२४

जाणून घ्या आजचे राशिभविष्य
Horoscope Today
जाणून घ्या तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? | File Photo
Published on
Updated on

Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.

मेष : आज कार्यकुशलतेने तुम्ही तुमचे काम पूर्ण करू शकाल

Daily Horoscope
मेष File Photo

मेष : श्रीगणेश म्‍हणतात की, आज कार्यकुशलतेने तुम्ही तुमचे काम पूर्ण करू शकाल. उधार दिलेले पैसे आज परत मिळू शकतात. तरुणांना त्यांच्या मेहनतीनुसार अनुकूल परिणाम मिळतील. रुपया येताच खर्चाची परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे तुमचे बजेट योग्य ठेवा. इतरांचे ऐकू नका. तुमची फसवणूक होऊ शकते. आज जमीन खरेदी-विक्री टाळा. तुम्हाला आज काही विश्वसनीय पक्षांकडून नवीन ऑफर मिळू शकतात. खूप काम असले तरी कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुमचा ताजेपणा राहील. तुमच्यावर ताण येऊ देऊ नका.

वृषभ : आज घरात शुभ कार्याची योजना असू शकते

Daily Horoscope
वृषभFile Photo

वृषभ : आज घरात शुभ कार्याची योजना असू शकते. कौटुंबिक समस्या किंवा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करताना तुमचा सल्ला मोलाचा ठरेल. जीवनात काही बदल होतील जे तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. मुलांची कोणतीही अपरिचित नकारात्मक कृती तुम्हाला त्रास देऊ शकते. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण वागण्याचा प्रयत्न करा. अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात राहू नका. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाच्या योजना कोणालाही सांगू नका. पती-पत्नीमध्ये योग्य सामंजस्य राहील. प्रकृती चांगली राहिल.

मिथुन : आज संपर्कक्षेत्रातून नवीन संधी मिळेल

Daily Horoscope
मिथुनFile Photo

मिथुन : श्रीगणेश सांगतात की, आज संपर्कक्षेत्रातून नवीन संधी मिळेल. महिलांसाठी आजचा दिवस शुभ राहील. तुमची प्रतिभा आणि क्षमता तुम्हाला कोणतेही नवीन यश मिळविण्यात मदत करतील. भूतकाळातील कोणत्याही नकारात्मक गोष्टीचा तुमच्या वर्तमानावर वाईट परिणाम होऊ शकतो याची जाणीव ठेवा. तुमची ऊर्जा सध्याच्या परिस्थितीवर केंद्रित करा. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्‍याची आवश्‍यकता आहे. बेफिकीर राहू नका. पती-पत्नी एकमेकांच्या भावनांचा आदर करतील. पाय दुखीची समस्‍या जाणवेल.

कर्क : आज अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यांत सहभागी व्‍हाल

Daily Horoscope
कर्कFile Photo

कर्क : श्रीगणेश म्‍हणतात की, आज अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यांत सहभागी व्‍हाल. अनुभवी लोकांच्या सहवासामुळे तुमची कार्यक्षमता आणि व्यक्तिमत्व संवर्धन होईल. मात्र भविष्‍यातील तुमच्या उपक्रमांबाबत कोणाशीही चर्चा करू नका. आळस टाळा. स्वभावात सौम्यता ठेवा. रागामुळे काही गोष्टी बिघडू शकतात. वैवाहिक जीवनात लहान-मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. अनियमित दैनंदिनीमुळेआरोग्य बिघडू शकते.

सिंह : आज तुम्ही मित्र आणि नातेवाईकांसोबत आनंदात वेळ व्‍यतित कराल

Daily Horoscope
सिंहFile Photo

सिंह : श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही मित्र आणि नातेवाईकांसोबत आनंदात वेळ व्‍यतित कराल. यामुळे तुम्हाला उत्साही वाटेल. आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्याही यशस्वी ठरू शकतो. जवळचा प्रवासही घडू शकतो. कुटुंबातील सदस्याच्या तब्येतीची चिंता राहील. तुमचे काही महत्त्वाचे काम अपूर्ण राहू शकते. घरातील सदस्यांमध्ये सुसंवाद कायम राहील. आरोग्‍याची काळजी घ्‍या.

कन्या : आज मित्राला संकटात मदत कराल

Daily Horoscope
कन्याFile Photo

कन्या : श्रीगणेश सांगतात की, आज मित्राला संकटात मदत कराल. अफवांवर लक्ष देऊ नका. तुमच्या कामाप्रती समर्पित राहा. कोणत्याही महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मालमत्ता किंवा वाहन कर्जाबाबत पुनर्विचार करा. मन शांत ठेवा. अहंकार तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेऊ शकतो. आर्थिक अडचण दूर झाल्यामुळे उत्पादनात पुन्हा गती येईल.आरोग्य उत्तम राहील.

तूळ : आज धार्मिक यात्रेसाठी कौटुंबिक योजना असेल

Daily Horoscope
तूळ File Photo

तूळ : श्रीगणेश म्‍हणतात की, आज धार्मिक यात्रेसाठी कौटुंबिक योजना असेल. तरुणांचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागतील. भविष्यातील निर्णय घेण्याची हिंमत त्यांच्यात निर्माण होईल. दुसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे दिनचर्या खराब होऊ शकते. कोणाशीही संवाद साधताना आपल्या व्यवहारात सौम्यता ठेवा. व्यवसाय क्षेत्राशी संबंधित कोणताही प्रस्ताव येईल. जास्त काम असूनही तुम्ही कुटुंबासाठी वेळ काढू शकाल. आाहराबरोबरच दिनचर्येकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

वृश्चिक : आज परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असेल

Daily Horoscope
वृश्चिकFile Photo

वृश्चिक : आज परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असेल. परिश्रमाचा लाभ मिळेल. विद्यार्थी अडचणींवर मात करण्यास सक्षम असतील. केवळ कुटुंबातील सदस्यामुळे तुमच्यामध्ये अंधश्रद्धा निर्माण होऊ शकतात. यामुळे नातेसंबंधात दुरावा येऊ शकतो. घरातील ज्येष्ठांचा आदर राखा. नकारात्मक विचारांना बळी पडू नका. घरातील वातावरण प्रसन्न राहिल. धोकादायक कृती टाळा.

धनु : आज प्रतिष्ठित लोकांबरोबर झालेली भेट फायदेशीर ठरेल

Daily Horoscope
धनुFile Photo

धनु : आज प्रतिष्ठित लोकांबरोबर झालेली भेट फायदेशीर ठरेल. अनुकूल ग्रहामन तुमच्यासाठी नवीन यश निर्माण करत आहे. कोणत्याही अनैतिक कृत्यात रस घेऊ नका. खर्चावर नियंत्रण ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. पती-पत्नीमधील गैरसमजामुळे वाद निर्माण होऊ शकतात. रक्तदाब, मधुमेहाचा त्रास असणार्‍यांनी काळजी घ्‍यावी.

मकर : आज आज तुमच्यासोबत एखादी सुखद घटना घडेल

Daily Horoscope
मकरFile Photo

मकर : श्रीगणेश सांगतात की, आज आज तुमच्यासोबत एखादी सुखद घटना घडेल ज्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल. घरी पाहुण्‍याचे आगमन होईल. जमिनीशी संबंधित कामातील कागदपत्रे व्यवस्थित तपासा. थोडे कल्पकतेने आणि समजूतदारपणाने काम होईल. व्यवसायाशी संबंधित कामे व्यवस्थित पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांचा सल्ला विचारात घ्या. घर आणि व्यवसाय दोन्हीमध्ये योग्य समन्वय राखला जाईल. आरोग्य सामान्य राहील.

कुंभ : आर्थिक व्यवहार करताना अधिक काळजी घेणे आवश्यक

Daily Horoscope
कुंभFile Photo

कुंभ : श्रीगणेश म्‍हणतात की, कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या चांगल्या यशासाठी घरात उत्सवाचे वातावरण असेल. संपर्कक्षेत्रात वाढ होईल. आर्थिक व्यवहार करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्यासोबत काही फसवणूक होऊ शकते. घरातील कोणतीही समस्या सोडवताना विवेक वापरा. कोणताही निर्णय घेण्यात जास्त वेळ घालवू नका. कामाच्या ठिकाणी घेतलेले ठोस निर्णय चांगले आणि यशस्वी ठरतील. घरातील व्यवहारात ढवळाढवळ करू नका आणि छोट्या-मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्य उत्तम राहील.

मीन : आज ग्रहमान तुमच्यासाठी अनुकूल आहे

Daily Horoscope
मीनFile Photo

मीन : श्रीगणेश सांगतात की, आज ग्रहमान तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुम्ही तुमच्या विवेकबुद्धीने लक्षणीय यश मिळवाल. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्‍हाल. मालमत्तेशी संबंधित कोणतेही काम असू शकते. जवळच्या नातेवाईकांसोबत थोडा वेळ घालवा. तुमचे नाते सुधारेल. इतरांचे प्रश्न सोडवल्याने तुमचे महत्त्वाचे काम थांबू शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद घालणे योग्य ठरणार नाही. पती-पत्नीचे नाते मधुर होईल. अति कामामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा आणेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news