आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? | मंगळवार, २८ जानेवारी २०२५

जाणून घ्या आजचे राशिभविष्य
Horoscope Today
जाणून घ्या तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? | File Photo
Published on
Updated on

Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.

मेष : आज तुम्ही ध्‍येयपूर्तीसाठी कठोर परिश्रम कराल

Daily Horoscope
मेष File Photo

मेष : श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्ही ध्‍येयपूर्तीसाठी कठोर परिश्रम कराल. बेकायदाशीर कामात गुंतलेल्‍यांपासून सावध राहा. अचानक काही खर्च होऊ शकतात. आर्थिक प्रश्‍नी निर्णय घेण्यास अडचण येत असेल तर ज्‍येष्‍ठांचा सल्‍ला घ्‍या. कुटुंबातील वातावरण आनंदी राहिल.

वृषभ : आज तुम्ही घेतलेला महत्त्वाचा निर्णय योग्‍य ठरेल

Daily Horoscope
वृषभFile Photo

वृषभ : आज तुम्ही घेतलेला महत्त्वाचा निर्णय योग्‍य ठरेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अतिआत्मविश्वास तुम्हाला अडचणीत आणू शकतो, याची जाणीव ठेवा. संवाद साधताना नकारात्मक शब्द वापरू नका. गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल नाही.

मिथुन : कोणतेही काम घाई गडबडीत पूर्ण करण्‍याचा प्रयत्न करु नका

Daily Horoscope
मिथुनFile Photo

मिथुन : आज कोणतेही काम घाई गडबडीत पूर्ण करण्‍याचा प्रयत्न करु नका. शांतपणे केलेली सर्व कामे योग्यरित्या पूर्ण होतील. सकारात्‍मक विचार तुम्हाला समस्या सोडवण्यास मदत करेल. स्वतःला श्रेष्ठ मानणे नुकसानकारक ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.

कर्क : मनाप्रमाणे कामे पूर्ण होतील

Daily Horoscope
कर्कFile Photo

कर्क : आज तुमच्‍या मनाप्रमाणे कामे पूर्ण होतील. तरुणाई करिअरवर लक्ष केंद्रीत करेल. इतरांच्या बोलण्यात अडकून स्वतःला दुखवू शकता. मनात नकारात्मक विचार येतील. स्वतःवर विश्वास ठेवा. व्‍यवसायिक कामे मार्गी लागतील.

सिंह : आजचा दिवस महिलांसाठी विशेषतः आरामदायी

Daily Horoscope
सिंहFile Photo

सिंह : आजचा दिवस महिलांसाठी विशेषतः आरामदायी असेल. नवीन योजना आखल्या जातील. अतिश्रमाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होवू शकतो. घाई करण्याऐवजी कोणतेही काम सहजतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव राहील. कुटुंबासोबत वेळ व्‍यतित कराल. आरोग्य चांगले राहिल.

कन्या : ग्रहांची स्थिती अनुकूल आहे

Daily Horoscope
कन्याFile Photo

कन्या : ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. तुमची कामगिरी अपेक्षेपेक्षा अधिक प्रभावी असेल. काही दिवसांपासून सुरू असलेल्या दिनचर्येत सकारात्मक बदल होईल. तुम्ही सामाजिक कार्यातही सहभागी व्हाल. आज कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा.

तूळ : आज कठोर परिश्रमाने भविष्यातील यशाची पेरणी होईल

Daily Horoscope
तूळ File Photo

तूळ : श्रीगणेश म्हणतात की, आज कठोर परिश्रमाने भविष्यातील यशाची पेरणी होईल. कौटुंबिक बाबींमध्ये तुमचा निर्णय सर्वात महत्त्वाचा असेल.भावांसोबत तणाव निर्माण होऊ देऊ नका. बाहेरील लोकांशी व्यवहार करताना काळजी घ्या.

वृश्चिक : आज काही जुने मतभेद दूर होतील

Daily Horoscope
वृश्चिकFile Photo

वृश्चिक : श्रीगणेश सांगतात की, आज काही जुने मतभेद दूर होतील. समर्पणाने महत्त्वाचे काम पूर्ण कराल. स्वप्नांच्या जगातून बाहेर पडा आणि वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात प्रयत्‍नाप्रमाणे यश मिळणार नाही.

धनु : आज आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे

Daily Horoscope
धनुFile Photo

धनु : श्रीगणेश म्‍हणतात, आज आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. मित्रांच्‍या भेटीने जुन्या आठवणीही ताज्या होतील. इतरांच्या कामात ढवळाढवळ करु नका. जवळच्या व्यक्तीशी वाद टाळा. व्यवसायिक कामात काही अडथळे येऊ शकतात.

मकर : कार्यक्षेत्रात सर्व कामे स्वतः व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा

Daily Horoscope
मकरFile Photo

मकर : श्रीगणेश म्‍हणतात की, आज ग्रहमान अनुकूल आहे. कार्यक्षेत्रात सर्व कामे स्वतः व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. मुलांवर जास्त बंधने लादू नका, त्यामुळे त्यांचे मनोबल कमी होऊ शकते. आनंददायी कौटुंबिक वातावरण राखण्यासाठी, कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ व्‍यतित करा.

कुंभ : व्यवसायात, नवीन कामात तुमची आवड वाढेल

Daily Horoscope
कुंभFile Photo

कुंभ : तुम्ही केलेल्या कोणत्याही चांगल्या कामासाठी तुम्हाला समाजात आदर मिळेल. पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर त्याबद्दल गांभीर्याने विचार करा. व्यवसायात नवीन कामात तुमची आवडही वाढेल.

मीन : आत्मविश्वासाने संकटावर मात कराल

Daily Horoscope
मीनFile Photo

मीन : आज तुम्‍ही तुमच्या आत्मविश्वासाने संकटावर मात कराल. अपयशामुळे विद्यार्थ्यांना निराशा जाणवेल. घरातील सुधारणा करण्यापूर्वी तुमचे बजेट विचारात घ्या. कामाचा ताण जास्त असल्याने, घर आणि कुटुंबासाठी थोडा वेळ काढणे महत्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news