आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? | गुरूवार, २७ फेब्रुवारी २०२५

Horoscope | जाणून घ्या आजचे राशिभविष्य
Horoscope Marathi
आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल ?AI Photo
Published on
Updated on

. Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.

मेष : आजचा दिवस संमिश्र स्‍वरुपाचा आहे

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

श्रीगणेश म्‍हणतात की, आजचा दिवस संमिश्र स्‍वरुपाचा आहे. दुपारनंतर परिस्थिती अनुकूल असेल. तुमच्‍या कौशल्यांचे नातेवाईकांकडून कौतुक होईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाल्‍याने दिलासा मिळेल. कोणताही निर्णय घाईघाईने भावनेच्‍या आहारी जावून घेऊ नका. यामुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. व्यवसायातील कामे थोडी मंदावतील. पती-पत्नीमध्ये सुसंवाद राखला जाईल. आरोग्‍याची काळजी घ्‍या.

वृषभ : आर्थिक परिस्थितीत काही चढ-उतार जाणवतील

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

श्रीगणेश सांगतात की, मागील काही दिवसांपासून सुरु असणार्‍या ध्‍येयप्राप्‍तीमध्‍ये आज यश मिळेल. समविचारी लोकांबरोबरील संवादामुळे आत्‍मविश्‍वास वाढेल. नोकरदार महिला त्यांच्या जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडू शकतील. आर्थिक परिस्थितीत काही चढ-उतार जाणवतील. प्रवास टाळणे हितकारक ठरेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेले बदल खूप फायदेशीर ठरू शकतात. घराच्या व्यवस्थेबाबत पती-पत्नीमध्ये तणाव असू शकतो. आहाराची काळजी घ्‍या.

मिथुन : नवीन तंत्रज्ञान व्यवसाय वाढीसाठी फायदेशीर ठरेल

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

श्रीगणेश म्‍हणतात की, आज नवीन तंत्रज्ञान व्यवसाय वाढीसाठी फायदेशीर ठरेल. गेल्या काही काळापासून एखाद्या नातेवाईकासोबत सुरू असलेला गैरसमजही दूर होईल. तुमच्‍या योजनांवर चर्चा करू नका. तरुणांनी करिअर आणि अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. पती-पत्नी एकमेकांच्या भावना समजून घेतील. आरोग्य चांगले राहील.

कर्क : आर्थिक परिस्थिती चांगली राहील

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

श्रीगणेश सांगतात की, आज योग्य वेळी केलेल्या कृतींचे परिणाम देखील योग्य मिळू शकतात. आर्थिक परिस्थिती चांगली राहील; पण अचानक एखादी समस्या उद्भवू शकते सावधगिरी बाळगा. कार्यस्‍थळी जबाबदारी वाढेल. काही लोक तुमच्या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू शकतात. गेल्या काही वर्षांपासून क्षेत्रात सुरू असलेल्या योजना आज यशस्वी होऊ शकतात.

सिंह : अडकलेले किंवा उधार दिलेले पैसे परत मिळण्याचा योग

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

आज धार्मिक आणि सामाजिक कार्यात तुमचे विशेष योगदान असेल. तुम्ही तुमचे काम विचारपूर्वक आणि शांततेने पूर्ण कराल. अडकलेले किंवा उधार दिलेले पैसे परत मिळण्याचा योग आहे. मनोरंजनाच्या वस्तू खरेदी केल्याने खर्च वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. जोडीदाराचे किंवा कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. आरोग्य चांगले राहिल.

कन्या : आजचा दिवस तुमच्या मनाप्रमाणे जाईल

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

आजचा दिवस तुमच्या मनाप्रमाणे जाईल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम वाटेल. प्रियजनांना मदत केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. तुमची जीवनशैली देखील सुधारण्याचा प्रयत्न करत रहा. दिवसाच्या उत्तरार्धात चिंताजनक परिस्थिती उद्भवू शकते. छोट्या छोट्या गोष्टींबद्दल जास्त गोंधळून जाऊ नका. यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो.करिअर आणि कामाच्या क्षेत्रात चांगले प्रदर्शन करण्यासाठी कठोर परिश्रम कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आरोग्य चांगले राहील.

तूळ : पती-पत्नीचे एकमेकांना सहकार्य राहील

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

श्रीगणेश सांगतात की, आज धावपळीतून थोडी विश्रांती मिळेल. कोणावरही ठेवलेला अतिविश्‍वासाला तडा जावू शकतो. व्यावसायिक कामे पूर्वीसारखीच सुरू राहतील. पती-पत्नीचे एकमेकांना सहकार्य राहील. रक्‍तदाबाचा त्रास असणार्‍यांनी विशेष काळजी घ्‍यावी.

वृश्चिक : आज कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्यरित्या पूर्ण करू शकाल

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

आज कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्यरित्या पूर्ण करू शकाल. तुम्ही तुमच्या कर्मांसाठी पूर्णपणे समर्पित असाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या कठोर परिश्रमाचे योग्य फळ मिळेल. अतिश्रमाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अंतर्गत व्यवस्था सुधारू शकते. घरातील वातावरण सकारात्मक राहिल. आरोग्य समस्या जाणवतील.

धनु : कौटुंबिक वातावरण आनंददायीअसेल

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

श्रीगणेश म्हणतात की, आज अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाने अनेक अडचणी दूर करता येतात. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासावर केंद्रित असेल. आध्यात्मिक कार्यातील सहभागाने मनःशांती लाभेल. करिअरशी संबंधित समस्या सोडवाल. कौटुंबिक वातावरण आनंददायीअसेल. विश्रांतीसाठीही थोडा वेळ काढा.

मकर : आजचा दिवस आनंदी असेल

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस आनंदी असेल. मित्रांना भेटून एखाद्या विशिष्ट विषयावर चर्चा केल्याने मनाला शांती लाभेल. कुटुंबातील सदस्यांसोबत सकारात्मक वातावरण निर्माण होईल. गुंतवणुकीशी संबंधित कोणतेही निर्णय संपूर्ण माहिती घेतल्‍यानंतर घ्‍या. व्यापारात अधिक स्पर्धा जाणवेल. घरातील वातावरण आनंददायी राखता येईल. आरोग्य चांगले राहील.

कुंभ : आज स्‍वप्‍नपूर्तीचा अनुभव घ्‍याल

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

श्रीगणेश म्हणतात की, आज स्‍वप्‍नपूर्तीचा अनुभव घ्‍याल. मुलांच्या भविष्यासाठी नियोजन सकारात्मक ठरेल. एखाद्या सामान्य गोष्टीवरून जवळच्या नातेवाईकाशी वाद होऊ शकतो ज्यामुळे संबंध बिघडू शकतात. नवीन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवेळी खर्चाचा विचार करा. अति धावपळीमुळे थकवा जाणवेल.

मीन : घरी धार्मिक कार्य केल्याने देखील सकारात्मकता येऊ शकते

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

श्रीगणेश सांगतात की, आजचा बहुतेक वेळ घरातील कामांमध्ये आणि नातेवाईकांसोबत घालवला जाईल. ज्यामुळे तुम्हाला खूप आरामदायी अनुभव घेता येईल. घरी धार्मिक कार्य केल्याने देखील सकारात्मकता येऊ शकते. आर्थिक बाजू देखील चांगली राहील. व्यावसायिक दृष्टिकोनातून वेळ उत्कृष्ट असेल. कुटुंबातील वातावरणात कोणत्याही बाहेरील व्यक्तीला हस्तक्षेप करू देऊ नका. आरोग्य चांगले राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news