आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? | बुधवार, १२ फेब्रुवारी २०२५

Horoscope | जाणून घ्या आजचे राशिभविष्य
Horoscope Marathi
आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल ?AI Photo
Published on
Updated on

Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.

मेष : ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम कराल

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्‍ही विशिष्‍ट ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम कराल. अडचणीत असलेल्या प्रिय व्यक्तीला मदत केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. बेकायदेशीर कामात सहभागी असणार्‍या लोकांपासून दूर रहा; अन्यथा, तुमच्‍या प्रतिष्‍ठेला धक्‍का बसू शकतो. अचानक काही खर्च निघतील. निर्णयाबाबत व्‍दिधा मनस्‍थितीत असाल तर कुटुंबातील ज्‍येष्‍ठांचा सल्‍ला घ्‍या.

वृषभ : अतिआत्मविश्वास टाळा

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

आज तुम्ही घेतलेला कोणताही महत्त्वाचा निर्णय फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. अतिआत्मविश्वास टाळा. कोणत्‍याही परिस्‍थितीत मानसिक संतुलन कायम ठेवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. संवाद साधताना नकारात्मक शब्दांचा वापर टाळा. गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल नाही. व्यावसायिक कामे सामान्य राहतील. व्‍यस्‍त कामकाजातूनही कुटुंबासाठी वेळ काढावा लागेल.

मिथुन : कोणतेही काम घाई गडबडीने करू नका

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

श्रीगणेश सांगतात की, आज कोणतेही काम घाई गडबडीने संपविण्‍या ऐवजी शांतपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सर्व कामे योग्यरित्या पूर्ण होतील. संतुलित विचार आणि सकारात्‍मक दृष्टिकोन तुम्हाला समस्या सोडवण्यास मदत करेल. अति विचार टाळून कृतीला महत्त्‍व देणे फायदेशीर ठरेल. अहंकार टाळा. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.

कर्क : तरुणाईचे करिअरवर पूर्ण लक्ष सअसेल

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

आज मनापासून आनंद मिळणार्‍या कामात वेळ व्‍यक्‍तित केल्‍याने उत्‍साह वाढेल. तरुणाईचे करिअरवर पूर्ण लक्ष सअसेल इतरांच्या बोलण्यात अडकून स्वतःला दुखवू शकता. मनात नकारात्मक विचार येतील. संयम आणि चिकाटी ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा, असे श्रीगणेश सांगतात. कार्यालयात कर्मचाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

सिंह : आजचा दिवस महिलांसाठी विशेषतः आरामदायी असेल

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

आजचा दिवस महिलांसाठी विशेषतः आरामदायी असेल. नवीन योजना आखल्या जातील. अति श्रमाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होवू शकतो. भूतकाळातील कटू स्‍मृतींना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका; वर्तमानात जगायला शिका. घाई करण्याऐवजी कोणतेही काम सहजतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव राहील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने वातावरण आल्हाददायक राहील. आरोग्य चांगले राहिल.

कन्या : तुमची कामगिरी अपेक्षेपेक्षा अधिक प्रभावी

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

श्रीगणेश म्‍हणतात की, ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. तुमची कामगिरी अपेक्षेपेक्षा अधिक प्रभावी असेल. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दिनचर्येत सकारात्मक बदल होईल. सामाजिक कार्यातही सहभागी व्हाल. आज कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा. कोणत्‍याही विषयावर अतिचर्चा करु नका.

तूळ : भविष्यातील ध्येयपूर्तीसाठी आज तुम्‍ही कठोर परिश्रम कराल

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

श्रीगणेश सांगतात की, भविष्यातील ध्येयपूर्तीसाठी आज तुम्‍ही कठोर परिश्रम कराल. कौटुंबिक बाबींमध्ये तुमचा निर्णय सर्वात महत्त्वाचा असेल. भावांसोबतचा वाद टाळा. बाहेरील लोकांशी व्यवहार करताना काळजी घ्या. जोडीदारासह कुटुंबातील व्‍यक्‍तींबरोबर आनंदात वेळ व्‍यतित कराल.

वृश्चिक : काही जुने मतभेद दूर होतील

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

श्रीगणेश म्‍हणतात की, काही जुने मतभेद दूर होतील. समर्पित वृत्तीने महत्त्वाचे काम पूर्ण कराल. मुलांशी संबंधित समस्येवर तोडगा काढल्याने दिलासा मिळेल. स्वप्नांच्या जगातून बाहेर पडून वास्‍तवसमजून घेण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यावर अति विश्वास ठेवणे हानीकारक ठरेल.

धनु : आज मित्रासोबत सहलीचे नियोजन असेल

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

श्रीगणेश सांगतात की, आज मित्रासोबत सहलीचे नियोजन असेल. इतरांच्या कामात ढवळाढवळ करु नका. जवळच्या व्यक्तीशी वाद घातल्याने घराच्या व्यवस्थेवरही नकारात्मक परिणाम होईल. व्यवसायात काही अडथळे येऊ शकतात.

मकर : आज ग्रहमान अनुकूल आहे

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

श्रीगणेश म्‍हणतात की, आज ग्रहमान अनुकूल आहे. कार्यक्षेत्रात सर्व कामे स्वतः आयोजित करण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक वातावरण आनंददायी ठेवण्यासाठी, कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा. मुलांवर जास्त बंधने लादू नका, त्यामुळे त्यांचे मनोबल कमी होऊ शकते.

कुंभ : काही नवीन कामात तुमची आवड वाढेल

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

श्रीगणेश सांगतात की, तुम्ही केलेल्या कोणत्याही चांगल्या कामासाठी तुम्हाला समाजात आदर मिळेल. महत्त्वाच्या कामात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर त्याबद्दल गांभीर्याने विचार करा. सर्वांना खूश करण्याचा प्रयत्न करून तुम्ही स्वतःला दुखवू शकता, याची जाणीव ठेवा. काही नवीन कामात तुमची आवड वाढेल.

मीन : कोणत्याही संकटाचा सामना करू आत्मविश्वासाने कराल

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

श्रीगणेश म्‍हणतात की, कोणत्याही संकटाचा सामना करू आत्मविश्वासाने कराल. विद्यार्थ्यांना अपयश आले तरी पुन्हा प्रयत्न करावेत. तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल तुमच्या व्यवसायासाठी चांगले असू शकतात. कार्यक्षेत्रात अतिश्रम टाळा. कुटुंबासाठी थोडा वेळ काढणे महत्वाचे ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news