

मेष : आयुष्याबद्दल उदार दृष्टीकोन तयार करा. जगण्याबद्दल तक्रारी करून उदास होण्यात काहीही अर्थ नाही. जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल.
वृषभ : तणावमुक्तीसाठी कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा घ्या. त्यांची मदत घेणे उपकारक ठरेल. भावना आतल्या आत दाबून ठेवू नका.
मिथुन : अनावश्यक घटनांची चर्चा करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका. वादविवाद, चर्चामधून काहीही हाती लागत नाही.
कर्क : अवतीभोवतीचे लोक तुमच्याकडून खूप कामाच्या अपेक्षा करतील. परंतु, जेवढे काम तुम्ही करू शकता तेवढ्याचेच वचन द्या.
सिंह : आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. आत्मविश्वास वाढेल.
कन्या : वैवाहिक आयुष्यात वैयक्तिक स्वातंत्र्य हवे असते; पण आजचा दिवस एकमेकांच्या जवळ राहण्याचा आहे.
तूळ : अनुपस्थितीत सारे काही सुरळीत पार पडेल, पण विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्याच तर उपाय योजू शकाल.
वृश्चिक : तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तूची खरेदी संभवते.
धनु : तुम्ही खुशीत राहाल. आज धन हातात टिकणार नाही, धनसंचय करण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
मकर : हसतमुख अशा स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ मूडमुळे भोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लाभेल.
कुंभ : करिअरविषयक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे.
मीन: सकारात्मक फळ मिळणार आहे. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे पश्चाताप करावा लागेल.