

मेष : योजना बारगळण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करतील, म्हणून अवतीभवतीची माणसे काय करत आहेत याकडे लक्ष ठेवा.
वृषभ : कार्यालयातील वरिष्ठांच्या पाठिंब्यामुळे मनोधैर्य वाढेल. आध्यात्मिक गुरू अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल.
मिथुन : केवळ स्वतःच्या जीवावरच काम खेचून नेत आहात, असे चित्र असेल. सहकारी काही मदत करतील, असे दिसत नाही.
कर्क : प्रेमाच्या वाटेला आज एक नवे सुंदर वळण मिळणार आहे. आज तुम्हाला प्रेमाचा स्वर्गीय आनंद प्राप्त होणार आहे.
सिंह : तुमच्या जवळच्या माणसांबरोबर कोणताही वादविवाद छेडू नका. जर वादग्रस्त मुद्दे असतील तर ते परस्परसंमतीने सोडवता येतात. मनावर ताबा ठेवा.
कन्या : इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता बक्षीस मिळवून देईल. तुमच्या शृंगारिक कल्पनांची स्वप्ने पाहण्याची गरज नाही.
तूळ : दूरच्या नातेवाईकांडून आलेली बातमी तुमचा दिवस उजळून टाकेल. प्रिय व्यक्तीने दुस्वास केला तरी तुम्ही प्रेमाने वागा.
वृश्चिक : चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांकडून वादावादी आणि टीका संभवते.
धनु : आज तुम्ही प्रिय व्यक्तीकडे भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस खूप सुंदर असेल.
मकर: प्रकृती सुधारा आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी व्यक्तिमत्त्व बदला. पैशामुळे आज अनेक समस्या सुटतील.
कुंभ : जुन्या मित्रांबरोबरील भेटीगाठी उत्साह द्विगुणीत करतील. घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा, यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो.
मीन : संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थप्राप्त होतो हे ध्यानात ठेवा. तुम्ही किती काळजी करता है वागण्यातून इतरांना दिसू द्या.