Rashi Bhavishya Today: 'या' राशीच्या लोकांना आज अचानक आलेली संधी पुढील महिन्याची दिशा बदलू शकते, अनपेक्षित बातमी मिळेल

Horoscope 20 August 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : अचानक आलेली संधी पुढच्या महिन्याची दिशा बदलू शकते. अनपेक्षित बातमी मिळेल. पैशापेक्षा वेळेची गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : कामात तुमच्याकडे दुर्लक्ष करणारी व्यक्ती अचानक मदत करेल. घरातील एखादा निर्णय तुमच्या बाजूने वळण्याची शक्यता आहे.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : नवकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा दिवस. कामात तुमची चपळता इतरांचे लक्ष वेधून घेईल. खर्चावर नियंत्रण हिताचे ठरेल.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : भावनेत घेतलेला निर्णय पुढे ढकलणे योग्य ठरेल. कामाच्या ठिकाणी शांत वृत्ती लक्ष वेधून घेईल. मनापासून कौतुक मिळेल.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : योग्य व्यक्ती ओळखणे महत्त्वाचे ठरेल. वरिष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल. अचानक मिळालेला छोटा आर्थिक फायदा आनंद देईल.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्याः किरकोळ काम महत्त्वाचे ठरेल. कागदपत्रे, आकडे आणि वेळापत्रक दोनदा तपासा. मित्राची कल्पना नवी दिशा देईल.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : तुमची भूमिका निर्णायक ठरेल. नोकरी-व्यवसायात नवीन संपर्क फायदेशीर ठरू शकतो. संभ्रम दूर करण्यासाठी विचार करा.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : गुप्तपणे केलेली तयारी उपयोगी पडेल. एखादी व्यक्ती तुमची परीक्षा घेत असल्यासारखी वाटेल, पण शांत राहा.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनू : रुटीन मोडून केलेला छोटा प्रयोग यशस्वी ठरू शकतो. नवीन व्यक्तीशी ओळख होण्याची शक्यता. विनोद तणाव कमी करेल.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : रखडलेले काम पुढे सरकेल. विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीची अपेक्षा पूर्ण करा. मनातील गोष्ट बोलून दाखवण्याची वेळ आहे.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : नेहमीच्या चौकटीबाहेरचा विचार तुमची ताकद ठरेल. कामात छोटा धोका घेतल्यास नवीन संधी उघडू शकते. मित्र मदत करेल.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : अंतर्मनाचा संकेत दुर्लक्षित न केलेला बरा. कामात तुमची मेहनत योग्य व्यक्तीच्या लक्षात येईल. नात्यात संवाद ठेवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news