

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : रखडलेली कामे पूर्ण होतील. घरातील वडीलधाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ : आर्थिक लाभहोण्याची शक्यता आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.
मिथुन : वाणीवर नियंत्रण ठेवा, वादविवाद टाळा. कामाच्या ठिकाणी धावपळ होऊ शकते.
कर्क : कुटुंबासोबत आनंदात वेळ जाईल. जोडीदाराकडून चांगली बातमी मिळेल. मन प्रसन्न राहील.
सिंह : आत्मविश्वासात वाढ होईल. नोकरीत प्रगतीचे योग आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवा.
कन्या : जुन्या मित्रांच्या भेटीमुळे आनंद होईल. गुंतवणुकीतून लाभ मिळेल. सकारात्मक विचार करा.
तूळ : कायदेशीर कामात यश मिळेल. प्रवासाचे योग आहेत. खाण्यापिण्यावर पथ्य पाळा.
वृश्चिक : रखडलेले पैसे परत मिळतील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. विरोधकांपासून सावध राहा.
धनु : भाग्याची साथ लाभेल. रखडलेली कामे पूर्ण झाल्याने समाधान वाटेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल.
मकर : कामात यश मिळेल; पण मेहनत जास्त करावी लागेल. तब्येतीची कुरबुर जाणवेल.
कुंभ : शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. अचानक धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. उत्साही वाटेल.
मीन : घराच्या सजावटीवर खर्च होईल. घरातील वातावरण सुखद राहील. कोणाकडूनही कर्ज घेऊ नका.