

मेष : ध्यानधारणा आणि योगासने यामुळे तुम्हाला आध्यात्मिक फायदा होईल. तुमच्या जवळ आज पैसा ही पर्याप्त असेल.
वृषभ : सामाजिक आयुष्यापेक्षा स्वतःला प्राधान्य द्या. आर्थिक आघाडीवरील सुधारणा प्रलंबित देणी देण्यास उपयोगी पडतील.
मिथुन : कुटुंबातील सदस्यांची मदत गरजा पुऱ्या करण्याची काळजी घेईल. प्रिय आवडत्या व्यक्तीशी शालिनतेने वागा.
कर्क : आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज निर्माण होईल. उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल, यामुळे आर्थिक फायदा संभवतो.
सिंह : बोलण्याच्या कारणाने तुम्ही स्वतःला चिंतेत टाकू शकतात. वेळ भरभर निघून जाते म्हणून आजपासूनच आपल्या किमती वेळेचा योग्य वापर करा.
कन्या : कार्यालयातील वरिष्ठांच्या पाठिंब्यामुळे मनोधैर्य वाढेल. हाती घेतलेले काम आज अपेक्षेप्रमाणे चांगले पूर्ण होईल.
तूळ : एका कठीण काळानंतर, आजच्या दिवशी आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. घरातील लहान सदस्यांसोबत आनंद साजरा करा.
वृश्चिक : उच्च आत्मविश्वास आज चांगल्या कामासाठी वापरा. धावपळीचा दिवस असला, तरी तुमची ऊर्जा टिकून राहील.
धनु : आज तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्यातल्या दुःखद आठवणी विसरून जाल आणि वर्तमानकाळ साजरा कराल.
मकर: गरज नसलेल्या कोणत्याही विचारांना थारा देऊ नका. शांत आणि तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा, त्यातूनच कणखरपणा वाढेल.
कुंभ : सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने तुमची संध्याकाळ अपेक्षेपेक्षा चांगली जाईल. प्रवासामुळे प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न राहील.
मीन : प्रेमात आकंठ बुडालेले असतात, त्यांना प्रेमगीत ऐकू येते. आज ते ऐकू येईल, ज्याने सर्वकाही विसरून जाल.