Surya Grahan 2026 | फेब्रुवारी महिन्यात वर्षातील पहिले सूर्यग्रहण, भारतात दिसणार का? जाणून घ्या सविस्तर

१७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारे सूर्यग्रहण 'वलयाकार' स्वरूपाचे असेल
Surya Grahan 2026
प्रातिनिधिक फोटो.File Photo
Published on
Updated on
Summary
  • ज्योतिष गणनेनुसार, या ग्रहण काळात सूर्य कुंभ राशीत विराजमान असेल आणि राहूशी युती करेल, ज्यामुळे 'ग्रहण योग' निर्माण होत आहे.

Surya Grahan 2026

नवी दिल्ली : खगोलीय आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे वर्षातील पहिले सूर्यग्रहण फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. २०२६ सालातील हे पहिले ग्रहण फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला म्हणजेच १७ फेब्रुवारी २०२६ रोजी लागणार आहे. हे ग्रहण 'वलयाकार' स्वरूपाचे असेल, ज्याला वैज्ञानिक भाषेत 'रिंग ऑफ फायर' असेही म्हटले जाते.

सूतक काळ पाळावा लागणार का?

  • ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहणाच्या साधारण १२ तास आधी सूतक काळ सुरू होतो. या काळात मंदिरांचे दरवाजे बंद ठेवले जातात आणि धार्मिक कार्यांवर मर्यादा येतात. मात्र, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे, भारतात सूतक काळ मान्य नसेल. त्यामुळे दैनंदिन धार्मिक विधी आणि शुभ कार्यांवर कोणताही परिणाम होणार नाही.

Surya Grahan 2026
Surya-Chandra Yuti 2026 | नवीन वर्षात सूर्य-चंद्राची होणार युती ; 'या' राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू!

ग्रहांची स्थिती काय सांगते?

ज्योतिष गणनेनुसार, या ग्रहण काळात सूर्य कुंभ राशीत विराजमान असेल आणि राहूशी युती करेल, ज्यामुळे 'ग्रहण योग' निर्माण होत आहे.

Surya Grahan 2026
Surya-Chandra Yuti 2026 | नवीन वर्षात सूर्य-चंद्राची होणार युती ; 'या' राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू!

भारतात ग्रहण दिसणार का?

खगोलप्रेमींसाठी महत्त्वाची बाब म्हणजे, वर्षाचे हे पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे ग्रहण प्रामुख्याने दक्षिण अमेरिका, आफ्रिकेचे काही भाग, अटलांटिक महासागर, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका, झांबिया, मोझांबिक, मॉरिशस, अंटार्कटिका आणि टांझानिया यांसारख्या देशांमध्ये दृश्यमान असेल.

मार्चमध्ये होणार वर्षातील पहिले चंद्रग्रहण

सूर्यग्रहणानंतर अवघ्या काही दिवसांतच वर्षातील पहिले चंद्रग्रहण देखील होणार आहे. ३ मार्च २०२६ रोजी हे चंद्रग्रहण लागेल. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी ०६:२२ मिनिटांनी ग्रहण सुरू होईल. विशेष म्हणजे, हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असून याचा कालावधी सुमारे १ तास ३१ मिनिटे इतका असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news