

Surya Grahan 2025 is partial solar eclipse visible in india
पुणे : 2025 मधील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण रविवारी, (२१ सप्टेंबर) लागणार आहे. हे आंशिक सूर्यग्रहण (जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो, पण ते तिघे एका सरळ रेषेत नसतात. त्यामुळे, चंद्र सूर्याचा काही भाग झाकतो.) असेल. काही ठिकाणी आकाशात अर्धचंद्राकार सूर्य दिसेल. जाणून घेवूया, सूर्यग्रहण केव्हा लागणार, सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे का? याविषयी...
सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग पुणे नुसार, हे आंशिक सूर्यग्रहण ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागांत, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर आणि अंटार्क्टिकामध्ये दिसेल.
२१ आणि २२ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाचे विविध देशांतील वेळा जाहीर करण्यात आल्या आहेत.
ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात सूर्यग्रहण स्थानिक वेळेनुसार सकाळी ५:४५ वाजता सुरू होईल आणि सकाळी ७:१५ वाजता संपेल.वेध प्रारंभ: ५:५० संध्याकाळी (पूर्व दिवस), गर्भवती/अशक्त: १:१७ रात्री (पूर्व दिवस),
ब्रिस्बेन शहरात : ग्रहणस्पर्श सकाळी : ५:३७, ग्रहणमोक्ष: ७:०० सकाळ, वेध प्रारंभ: ५:४३ संध्याकाळी, गर्भवती/अशक्त: १:१० रात्री
हॉबर्ट शहर : येथे ग्रहण सकाळी ६:०० वाजता सुरू होऊन सकाळी ७:४६ वाजता संपेल. वेध प्रारंभ: ६:०५ संध्याकाळी, गर्भवती/अशक्त: १:३२ रात्री
न्यू कॅलेडोनिया: येथे सकाळी ५:४४ वाजता ग्रहणाला सुरुवात होईल आणि सकाळी ६:२६ वाजता ते समाप्त होईल.
पोर्ट व्हिला, वानुआटू: येथे सकाळी ५:३६ वाजता ग्रहण सुरू होऊन सकाळी ६:१५ वाजता संपेल.
न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे ग्रहण २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६:११ वाजता सुरू होऊन सकाळी ८:०४ वाजता संपेल. वेध प्रारंभ: ६:१६ संध्याकाळी (२१ सप्टेंबर)
वेलिंग्टन, न्यूझीलंड: येथे ग्रहण २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६:१९ वाजता सुरू होऊन सकाळी ८:१५ वाजता संपेल. गर्भवती/अशक्तांनी सायंकाळी ६:१७ पासून वेध पाळावेत. याव्यतिरिक्त मॅक्वेरी आयलंड, सुवा (फिजी), रारोटोंगा (कूक आयलंड), पापीटे (ताहिती) यांसारख्या अनेक ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे.
भारतात सूर्यग्रहण दिसणार आहे का?
सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग पुणे नुसार, या वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण रविवारी, (२१ सप्टेंबर) लागणार आहे; पण हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.
भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही मग नियम पाळावेत का?
कोणत्याही व्यक्तीने या ग्रहणाचे कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही. भारतात राहणाऱ्या गर्भवती महिलांनीही कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्याची गरज नाही.
सूर्यग्रहण २०२५ ची लाइव्ह स्ट्रीमिंग (NASA) आणि www.timeanddate.com यांच्या वेबसाइट/यूट्यूब चॅनलवर थेट पाहू शकता.
(वरील माहिती पुण्यातील पंचांगकर्ते पं. गौरव देशपांडे यांनी दिली असून शब्दांकन पुढारी डिजिटल टीमने केले आहे)