

Surya Gochar 2025 : ग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य (Surya) जेव्हा जेव्हा नक्षत्र बदलतो, तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो. काही राशींना या बदलामुळे लाभ होतो, तर काहींना आव्हानांचा सामना करावा लागतो. पंचांगानुसार, १० ऑक्टोबर रोजी सूर्याने चित्रा नक्षत्रात प्रवेश केला असून, तो २३ ऑक्टोबरपर्यंत या नक्षत्रात राहील. चित्रा नक्षत्राचा स्वामी ग्रह मंगल आहे. त्यामुळे, मंगळाच्या नक्षत्रात सूर्याचा झालेला हा गोचर (Surya Gochar) काही राशींसाठी विशेष फायदेशीर ठरू शकतो. जाणून घेवूया या तीन राशी कोणत्या आहेत याविषयी...
मंगळाच्या नक्षत्रातील सूर्याचा गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायी ठरू शकतो. हा काळ त्यांच्यासाठी सुख-शांती, भावनिक स्थिरता आणि समृद्धी घेऊन आला आहे. या काळात आपला आत्मविश्वास वाढेल. आपले अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सकारात्मकता अनुभवायला मिळेल.
कन्या राशीसाठी मंगळाच्या नक्षत्रातील सूर्याचा गोचर शुभ मानला जात आहे. आर्थिक आघाडीवर हा गोचर लाभ आणि समृद्धी आणू शकतो. अनेक लोकांसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होऊ शकतात. करिअरमध्ये प्रगती आणि समाजात मान-सन्मान मिळण्याचीही दाट शक्यता आहे.
वृषभ राशीसाठी मंगळाच्या नक्षत्रातील सूर्याचा गोचर विशेषतः लाभदायक ठरू शकतो. कुटुंब आणि घराशी संबंधित बाबींमध्ये वाढ आणि सुधारणा हव्या असलेल्या लोकांसाठी हा काळ उत्कृष्ट आहे. मालमत्ता खरेदी करणे, घराची दुरुस्ती करणे किंवा कौटुंबिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी हा गोचर अनुकूल ठरणार आहे.
टीप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित सामान्य माहिती आहे. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.