आज सूर्याचे अश्लेषा नक्षत्रात संक्रमण; 'या' राशी ठरणार नशिबवान, होणार तुफान कमाई

सूर्य गोचर | Sun Transit - प्रत्यक्ष देवात सूर्यनारायणाचे संक्रमण ठरणार फलदायी
Sun Transit in Ashlesha
शुक्रवारी (२ ऑगस्ट) रात्री १० वाजून २२ मिनिटांनी सूर्य पुष्य नक्षत्रातून अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करत आहे.

आपण सूर्याला प्रत्यक्ष देवता मानतो. ग्रहमालेत सर्वांत महत्त्वाचे स्थान सूर्याला आहे. सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होते तसेच सूर्य नक्षत्र संक्रमणही करतो. या संक्रमणाचे परिणाम जगभर होताना दिसतात. शुक्रवारी (२ ऑगस्ट) रात्री १० वाजून २२ मिनिटांनी सूर्य पुष्य नक्षत्रातून अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करत आहे. अश्लेषा हे नवव्या क्रमांकाचे नक्षत्र आहे, हे नक्षत्र कर्क राशीच्या अंतर्गत येते आणि याचा राशिस्वामी बुध आहे. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य हा आत्मा, आरोग्य, मन, शिस्त, नेतृत्व, प्रशासन, राजकारण आदींचा कारक मानला जातो.

सूर्याच्या संक्रमणाचा राशींवर होणार परिणाम

अश्लेषा हे शक्तिमान नक्षत्र मानले गेले आहे. त्यामुळे सूर्याने या नक्षत्रात संक्रमण किंवा गोचर केल्याने एक वेगळी ऊर्जा निर्माण होणार आहे. त्यामुळे व्यक्ती नवीन उद्देश ठेवू शकतो आणि ती साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहातो. सूर्याच्या या नक्षत्र संक्रमणाचा सर्वाधिक लाभ कोणत्या राशींना होईल ते जाणून घेऊ.

1. मेष - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल

Sun transit

वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. या काळात विद्यार्थ्यांना नव्या संधी मिळतील आणि ते त्यांची क्षमता सिद्ध करून दाखवतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरदार लोक त्यांच्या सहकाऱ्यांत अधिक प्रसिद्ध होतील. व्यवसायात वृद्धी होण्याची शक्यता आहे. राजकारणात असलेल्या व्यक्तींची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

2. कर्क - नेतृत्व क्षमतांचा विकास

Sun transit

तुमच्या मनात जी वैचारिक द्विधा मनस्थिती सुरू आहे, ते संपून जाईल आणि तुम्हाला मानसिक शांतता मिळेल आणि तुम्ही तणावातून मुक्त व्हाल. विद्यार्थ्यांची कल्पता वाढेल. तसेच तुमच्या बुद्धिमत्तेचे कौतुक होईल. जे लोक साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात आहेत, त्यांची प्रसिद्धी वाढत जाईल. नोकरदार व्यक्तींच्या नेतृत्व क्षमतांची वृद्धी होईल आणि तुम्ही तुमच्या सहकार्यांना प्रेरित कराल. भागीदारीत व्यवसाय फायद्याचे ठरतील. कुटुंबीयांशी नातेसंबंध मधुर राहतील. वैवाहिक जीवन आनंदी असेल.

3. सिंह - नोकरदारांना पदोन्नती

Sun transit

सिंह राशीचा राशिस्वामी सूर्य आहे, त्यामुळे सूर्यदेवाच्या या संक्रमणामुळे सिंह राशीच्या लोकांचे चांगेल दिवस सुरू होणार आहेत. या काळात तुमची लोकप्रियता वाढेल आणि नोकरदारांना पदोन्नती मिळेल. तसेच भाग्यवृद्धी ही होईल. यापूर्वी तुम्हाला जी कामे कठीण वाटत होती, ती अगदी सहजरीत्या पूर्ण कराल. व्यवसायिकांना आर्थिक लाभ मिळतील, तसेच व्यवसायात यश मिळेल. करिअरमध्ये नवनवीन यश मिळवाल, तसेच पदोन्नतीच्या संधीही आहेत.

4. वृश्चिक - अपेक्षित यश मिळेल

Sun transit

सूर्याच्या या संक्रमणामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील आणि तुम्ही एकामागून एक यशाच्या पायऱ्या सर कराल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण अनुकूल राहील, आणि तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. या काळात तुम्ही नवी मालमत्ता आणि वाहन खरेदी कराल. प्रकृतीच्या समस्या दूर होतील. प्रेमजीवनात वेळ खास असेल. प्रेमजीवन आनंदी आणि समाधानी असेल.

5. धनू - मानसिक शांतता आणि स्थैर्य लाभेल

Sun transit

तुमचे व्यावसायिक कौशल्य आणि बुद्धिमत्ता यांचाय वापर करून तुम्ही फार चांगले पैसे मिळवाल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल, हा प्रवास लाभाचा ठरेल. धार्मिक कार्यात अधिकाधिक रस घ्याल. आध्यात्मिक बाजूकडे तुमचा कल वाढेल. मित्रांसोबत नातेसंबंध बळकट होतील. तुम्हाला मित्रांचे पूर्ण पाठबळ मिळेल. तुमची थकलेली आणि अपूर्ण कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना नवनवीन कल्पानांचा ध्यास लागेल आणि ते यश मिळवतील. मानसिक शांतता आणि स्थैर्य यांचा अनुभव घ्याल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news