Silver Lucky Dates: चांदी 'या' ४ तारखांना जन्मलेल्या लोकांसाठी अत्यंत भाग्यवान! गरीब माणूसही होतो श्रीमंत

Silver Benefits Numerology: अंकशास्त्रानुसार असा एक अंक आहे, ज्या मूलांकाच्या व्यक्तींवर चंद्राची विशेष कृपा असते, म्हणूनच त्यांना चांदी खूप लाभते.
Silver Lucky Dates
Silver Lucky Datesfile photo
Published on
Updated on

Silver Lucky Dates: चांदीच्या वाढत्या किमतींमुळे सध्या त्याची मोठी चर्चा सुरू आहे. बाजारातील गुंतवणूकदारांसोबतच अंकशास्त्राच्या अभ्यासकांचे लक्षही चांदीने वेधून घेतले आहे. ज्योतिषशास्त्रात चांदीचा संबंध चंद्राशी मानला जातो, जो मन, भावना आणि सुख-शांतीचा कारक ग्रह आहे. अंकशास्त्रानुसार चंद्राचा अंक २ आहे. असे मानले जाते की, या मूलांकाच्या व्यक्तींवर चंद्राची विशेष कृपा असते, म्हणूनच त्यांना चांदी खूप लाभते.

Silver Lucky Dates
Shani Sade Sati: काहीही करा, यश मिळणारच नाही! २०२७ पर्यंत 'या' राशींवर असेल शनीची साडेसाती आणि ढैय्या; 'हे' उपाय कराच!

कोणत्या तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असतो?

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० किंवा २९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असतो. या लोकांसाठी चांदी परिधान करणे विशेष फायदेशीर मानले जाते.

चांदीमुळे होणारे फायदे

  • व्यक्तीला सुख आणि शांतीचा अनुभव येतो.

  • मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे होते.

  • नात्यांमध्ये स्थिरता राहते.

  • राग आणि अहंकार दूर होतो.

  • कौटुंबिक जीवनातील तणाव कमी होऊन करिअरमध्ये प्रगती होते.

चांदीचे कोणते दागिने वापरावेत?

मूलांक २ च्या व्यक्ती ज्योतिषतज्ज्ञांच्या सल्ल्याने चांदीची अंगठी धारण करू शकतात. याशिवाय चांदीचे कडे किंवा ब्रेसलेटही घालता येते. तुम्ही हवं असल्यास तुमच्या पर्समध्ये चांदीचे एक नाणे देखील ठेवू शकता. सोमवारी चांदी परिधान करणे अधिक शुभ मानले जाते. चांदी धारण केल्यानंतर दूध, तांदूळ किंवा पांढऱ्या मिठाईचे दान करणे उत्तम असते.

'या' लोकांसाठी सोने असते शुभ

ज्योतिषशास्त्रात सोन्याला सूर्याची धातू मानले गेले आहे. सूर्याचा अंक १ आहे. कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक १ असतो. अशा लोकांसाठी सोने सर्वात शुभ मानले जाते.

सोने धारण करण्याचे फायदे

  • आत्मविश्वास वाढतो आणि नेतृत्व क्षमता मजबूत होते.

  • करिअरमध्ये वृद्धी आणि स्थिरता येते.

  • मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा मिळते आणि सरकारी कामांतील अडथळे दूर होतात.

Silver Lucky Dates
Angarak Yog 2026: कुंभ राशीत 'अंगारक योग'; 'या' ३ राशींवर येणार संकट, जाणून घ्या उपाय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news