Annual Horoscope 2025| वृश्चिक | संमिश्र स्वरुपाचे वर्ष

संकटाला सामोरी जाणारी, कठीण काळात न डगमगणारी, हार न मानणारी, शरण न पत्करणारी आपली रास आहे.
Daily Horoscope
वृश्चिकFile Photo
Published on
Updated on

आपल्या राशीकडे आत्मसंयमन, विवेक, निग्रह, निश्चयात्मकता, निर्धार या ज्या गोष्टी यशासाठी लागतात त्या आपणाकडे भरपूर आहेत. कोणतेही काम मनावर घेतल्यानंतर ते तडीला नेण्याची, ते काम शेवटापर्यंत नेण्याची जी निग्रह शक्ती लागते ती आपणाकडे असते. अव्याहतपणे, अप्रतिहतपणे, अविरतपणे, अखंडपणे काम करण्यामुळे यश मिळविण्याच्या बाबतीत वृश्चिक व्यक्ती आघाडीवर असतात. संकटाला सामोरी जाणारी, कठीण काळात न डगमगणारी, हार न मानणारी, शरण न पत्करणारी आपली रास आहे.

आरोग्य

आरोग्याच्या द़ृष्टीने वृश्चिक राशीच्या व्यक्तींना दि. 01/01/2025 ते दि. 14/05/2025 व दि. 19/10/2025 ते दि. 05/12/2025 हे कालखंड स्थूलमानाने अनुकूल आहेत. उर्वरित कालखंडात आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. सामान्यत: आरोग्य बरे राहील.

आरोग्य द़ृष्टीने चांगले कालखंड

दि. 01/01/2025 ते दि. 21/01/2025

दि. 02/04/2025 ते दि. 27/07/2025

दि. 27/10/2025 ते दि. 07/12/2025

व्यवसाय, उद्योग, आर्थिक स्थिती

व्यापार, व्यवसाय, उद्योग या क्षेत्राच्या द़ृष्टीने वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक आहे. गुरूची संपूर्ण वर्षभर असलेली भ्रमणे ही आर्थिक लाभाला चांगली आहेत. त्यामुळे आर्थिक लाभाच्या द़ृष्टीने वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हे वर्ष अनुकूल आहे. शनी वर्षभर अनुकूल आहे. त्यामुळे कापड, ज्वेलर्स, सराफ, केटरर्स, हॉटेल, रेस्टॉरंग, फूड प्रॉडक्टस्, जागा, जमिनी, इस्टेट एजंट, बांधकाम व्यवसाय, प्रॉपर्टी, बिल्डर्स, डेव्हलपर्स व कॉन्ट्रॅक्टर्स, वाहने या क्षेत्रातील व्यक्तींना सुयश लाभेल.

आर्थिक लाभाच्या द़ृष्टीने चांगला कालखंड

दि. 01/01/2025 ते दि. 30/05/2025

दि. 22/06/2025 ते दि. 01/10/2025

दि. 15/12/2025 ते दि. 31/12/2025

नोकरी

नोकरीतील वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हे वर्ष संमिश्र स्वरुपाचे आहे. स्थूलमानाने वृश्चिक राशीच्या व्यक्तींना दि. 01/01/2025 ते दि. 14/05/2025 व दि. 19/10/2025 ते दि. 05/12/2025 हे कालखंड वृश्चिक राशीच्या व्यक्तींना नोकरीमध्ये अनुकूल जातील. या कालखंडात आरोग्याचेही स्वास्थ्य राहील. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. या वर्षी बढतीचे विशेष योग येतील अशी शक्यता कमी आहे. परंतु नोकरीमध्ये आर्थिक लाभाचे वातावरण चांगले राहील. काहींना पगारवाढीची शक्यता आहे.

नोकरीत अधिक चांगला कालखंड

दि. 01/01/2025 ते दि. 21/01/2025

दि. 02/02/2025 ते दि. 27/07/2025

दि. 27/10/2025 ते दि. 31/12/2025

प्रॉपर्टी, संततिसौख्य

प्रॉपर्टी, गुंतवणूक घर, जागा, प्लॉट, फ्लॅट, वाहन खरेदी यासाठी हे वर्ष समाधानकारक आहे.

संततिसौख्य

संततिसौख्य, मुलामुलींची शाळा, कॉलेजमधील प्रवेश, त्यांची शैक्षणिक प्रगती, त्यांचे नोकरी, व्यवसायाचे प्रश्न या संदर्भात वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक आहे. मुलामुलींकरिता थोडा अधिक खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.

संततिसौख्यासाठी चांगला कालखंड.

दि. 01/01/2025 ते दि. 14/05/2025

दि. 18/10/2025 ते दि. 04/12/2025

वैवाहिक सौख्य :

सौख्याच्या द़ृष्टीने वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हे वर्ष संमिश्र स्वरुपाचे आहे. दि. 30/03/2025 पासून ते दि. 31/12/2025 पर्यंत शनी पाचव्या स्थानात राहणार आहे. हा शनी वैवाहिक सौख्य कमी करणार आहे. ज्यांच्या वैवाहिक जीवनात मूळचेच मतभेद आहेत त्यांनी अधिक काळजी करावयास हवी. संयम, विवेक, सहनशिलता, एकमेकांच्या विचारांचे आदानप्रदान या गोष्टींची आवश्यकता आहे. विवाहेच्छुंच्या विवाहासाठी खालील कालखंड हा अनुकूल आहे. खालील कालखंड विवाह, साखरपुडा व कोणत्याही शुभ कार्यासाठी अनुकूल आहे.

अनुकूल कालखंड

दि. 28/01/2025 ते दि. 30/05/2025

दि. 01/07/2025 ते दि. 26/07/2025

दि. 21/08/2025 ते दि. 02/11/2025

दि. 27/11/2025 ते दि. 19/12/2025

प्रवास

प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास या दृष्टीने वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हे वर्ष संमिश्र स्वरुपाचे आहे. मात्र, शिक्षण, तीर्थयात्रा, परदेश प्रवास या द़ृष्टीने वृश्चिक व्यक्तींना खालील कालखंड अनुकूल ठरतील.

प्रवासाच्या द़ृष्टीने चांगला कालखंड

दि. 28/01/2025 ते दि. 29/05/2025

दि. 06/06/2025 ते दि. 25/07/2025

दि. 26/11/2025 ते दि. 19/12/2025

सुसंधी

सुसंधी, प्रसिद्धी, लेखन, प्रकाशन, कला, संगीत, नाट्य, प्रसारमाध्यमे, वृत्तपत्र, कायदा, अभिनय या क्षेत्रातील वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आपआपल्या क्षेत्रामध्ये चांगली संधी मिळणार आहे. स्थूलमानाने दि. 01/01/2025 ते दि. 14/05/2025 व दि. 18/10/2025 ते दि. 04/12/2025 हे कालखंड यशाच्या द़ृष्टीने चांगले आहेत. याशिवाय विशेषत: खालील कालखंडात आपणाला आपल्या क्षेत्रामध्ये सुसंधी मिळेल. तुम्ही नवीन संपर्क साधू शकाल. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. आपल्या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करण्यामध्ये विशेष यश मिळेल.

सुसंधी, प्र्रसिद्धीसाठी अनुकूल कालखंड

स्थूलमानाने दि. 01/01/2025 ते दि. 14/05/2025 व दि. 18/10/2025 ते दि. 04/12/2025 हे कालखंड यशाच्या द़ृष्टीने चांगले आहेत. याशिवाय विशेषत: खालील कालखंडात आपणाला आपल्या क्षेत्रामध्ये सुसंधी मिळेल. तुम्ही नवीन संपर्क साधू शकाल. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. आपल्या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करण्यामध्ये विशेष यश मिळेल.

प्रतिष्ठा, अधिकारपद, मानमान्यता

समाजकारण, राजकारण, सार्वजनिक जीवन, शिक्षण, सहकार, बँकिंग या क्षेत्रामध्ये प्रतिष्ठा, मान, नावलौकिक, अधिकारपद, कीर्ती मिळण्याच्या द़ृष्टीने हे वर्ष समाधानकारक आहे. तुमच्या आजपर्यंतच्या कार्याचे चीज होईल. तुमच्या कार्यात तुम्हाला प्रतिष्ठा लाभेल. काहींना अधिकारपद लाभेल. तुम्ही आपल्या व्यक्तिमत्त्वाचा व कार्याचा ठसा उमटविण्यात यशस्वी व्हाल. काहींना एखाद्या नव्या क्षेत्रात काम करायला संधी मिळेल.

मान, प्रतिष्ठेसाठी चांगला कालखंड

दि. 13/04/2025 ते दि. 14/05/2025

दि. 06/06/2025 ते दि. 27/07/2025

दि. 16/08/2025 ते दि. 16/09/2025

दि. 28/09/2025 ते दि. 06/12/2025

सारांश :

व्यवसाय, व्यापार, आर्थिक लाभ या द़ृष्टीने हे वर्ष काही प्रमाणात अनुकूल आहे. नोकरीत बढतीची शक्यता आहे. या वर्षाचा पूर्वार्ध हा कला, संगीत, नाट्य या क्षेत्रामध्ये सुसंधी मिळवून देणारा आहे. हा कालखंड प्रॉपर्टीलाही चांगला आहे, संततिसौख्यालाही चांगला आहे. विद्यार्थ्यांना यश मिळण्याच्या द़ृष्टीने चांगला आहे. यावर्षी विवाहेच्छुंचे विवाह जमतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news