

निष्कपट व निर्मळ स्वभावाबद्दल आपण प्रसिद्ध असता. यामुळे आपले सर्वत्र स्वागत होत असते. व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने अत्यंत प्रसन्न परंतु सौम्य, भारदस्त असे आपले व्यक्तिमत्त्व असते. तत्त्वाला चिकटून राहण्याचा, कसल्याही प्रसंगात आपले ध्येय न सोडण्याचा आपला स्वभाव असतो. आपण आपल्या मूल्यांशी, आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड करणार नाही. आपल्याकडे सुसंस्कृतता असते, सभ्यता असते, माणुसकी असते. अखिल मानव जातीवर प्रेम करणारी आपली रास आहे. आपल्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये मधुरता व गोडवा असतो.
(Annual Horoscope 2025)
स्थूलमानाने दि. 15/05/2025 ते दि. 18/10/2025 व दि. 05/12/2025 ते दि. 31/12/2025 या कालखंडात धनु राशीचे आरोग्य हे चांगले राहणार आहे. दि. 30/03/2025 पासून धनु राशीच्या व्यक्तींच्यावर अधिक जबाबदारी येऊन पडणार आहे. कामाचा ताण जाणवेल, दगदग जाणवेल. नोकरी, व्यवसायात अधिक काम करावे लागेल.
आरोग्याच्या द़ृष्टीने चांगले कालखंड
दि. 02/04/2025 ते दि. 28/06/2025
दि. 16/09/2025 ते दि. 15/10/2025
दि. 02/11/2025 ते दि. 26/11/2025
आर्थिक लाभ, व्यवसाय, उद्योग, व्यापार, कारखानदारी या द़ृष्टीने धनु राशीच्या व्यक्तींना हे वर्ष कमी-अधिक समाधानकारक ठरेल. वर्षभर तुम्ही व्यवसायाच्या द़ृष्टीने सजग राहाल, जागरूक राहाल. धिम्या परंतु निश्चितपणे आर्थिक प्रगती समाधानकारक राहील. व्यवसायाची स्थिती समाधानकारक राहील. दि. 01/01/2025 ते दि. 18/10/2025 या कालखंडात आपण नवीन व्यवसाय सुरू करू शकता. व्यवसायाची नवीन शाखा सुरू करू शकता. दि. 01/01/2025 ते दि. 14/05/2025 या कालखंडात आर्थिक लाभ चांगले होतील. व्यवसायाची वाढ होईल. बाजारपेठेचा अभ्यास करून आपण व्यवसायात धाडस करू शकता.
आर्थिक लाभाच्या द़ृष्टीने चांगला कालखंड
दि. 28/01/2025 ते दि. 28/06/2025
दि. 27/07/2025 ते दि. 20/08/2025
दि. 16/09/2025 ते दि. 15/10/2025
दि. 02/11/2025 ते दि. 26/11/2025
नोकरीतील व्यक्तींना दि. 18/10/2025 पर्यंतचा कालखंड अधिक चांगला आहे. या कालखंडात नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. काहींना बढतीची शक्यता आहे. या कालखंडात पगारवाढीचीही शक्यता आहे. सामान्यत: धनु राशीच्या व्यक्तींना वरील कालखंड हा प्रगतीच्या द़ृष्टीने समाधानकारक आहे.
नोकरीत अधिक चांगला कालखंड
दि. 28/01/2025 ते दि. 26/07/2025
दि. 15/08/2025 ते दि. 17/10/2025
प्रॉपर्टी, गुंतवणूक, जागा, जमिनी, फ्लॅट, प्लॉट, बंगला, वाहन खरेदी या द़ृष्टीने धनु राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक आहे. दि. 30/03/2025 ते दि. 31/12/2025 हा कालखंड गुंतवणुकीला चांगला आहे. विशेषत: जागा, जमिनी यामध्ये केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल.
संततिसौख्य, मुलामुलींची प्रगती, शाळा, कॉलेजमधील प्रवेश, त्यांचे नोकरी, व्यवसायातील प्रश्न या द़ृष्टीने धनु राशीच्या व्यक्तींना हे वर्ष संमिश्र स्वरुपाचे आहे. मुलामुलींच्या प्रगतीच्या द़ृष्टीने फार मोठ्या आशा-आकांक्षा ठेवणे योग्य होणार नाही. नेहमीची स्थिती समाधानकारक असेल; परंतु फार मोठ्या अपेक्षा करण्यासारखी स्थिती नाही.
संततिसौख्यासाठी चांगला कालखंड
दि. 28/01/2025 ते दि. 01/04/2025
दि. 29/07/2025 ते दि. 16/08/2025
वैवाहिक सौख्याच्या द़ृष्टीने धनु राशीच्या व्यक्तींना हे वर्ष संमिश्र स्वरुपाचे आहे. विवाहेच्छुंचे विवाह जमण्याच्या द़ृष्टीने खालील कालखंड अनुकूल आहेत.
दि. 01/01/2025 ते दि. 18/10/2025
दि. 05/12/2025 ते दि. 31/12/2025
खालील कालखंड वैवाहिक सौख्याच्या द़ृष्टीने अनुकूल आहेत.
दि. 28/01/2025 ते दि. 01/04/2025
दि. 27/07/2025 ते दि. 24/10/2025
खालील कालखंड वैवाहिक सौख्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल आहेत. ज्यांच्या वैवाहिक जीवनात मूळचेच मतभेद आहेत ते मतभेद वाढण्याची शक्यता आहे. खालील कालखंडात धनु राशीच्या व्यक्तींनी संयम, विवेक, सहनशीलता या गोष्टी ठेवण्याची गरज आहे.
वैवाहिक सौख्याच्या द़ृष्टीने अनुकूल कालखंड
दि. 02/04/2025 ते दि. 04/06/2025
दि. 28/10/2025 ते दि. 31/12/2025
प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास या द़ृष्टीने धनु राशीच्या व्यक्तींना हे वर्ष सामान्यत: समाधानकारक आहे. स्थूलमानाने दि. 01/01/2025 ते दि. 26/06/2025 हा कालखंड अनुकूल आहे.
प्रवासाच्या द़ृष्टीने चांगला कालखंड
दि. 28/01/2025 ते दि. 01/04/2025
दि. 06/06/2025 ते दि. 27/07/2025
दि. 14/09/2025 ते दि. 26/11/2025
सुसंधी, प्रसिद्धी, अंगीकृत कार्यात यश या द़ृष्टीने हे वर्ष धनु राशीच्या व्यक्तींना समाधानकारक आहे, प्रगतीचे आहे. लेखन, प्रकाशन, कला, संगीत, नाट्य, वृत्तपत्र, प्रसारमाध्यमे, कायदा, अभिनय या क्षेत्रातील व्यक्तींना समाधानकारक यश मिळेल. त्याचबरोबर आर्थिक प्रश्नातही सुधारणा होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात आपण विशेष उंची गाठू शकाल त्याचबरोबर थोडा नावलौकिकही वाढेल.
सुसंधी, प्र्रसिद्धीसाठी अनुकूल कालखंड
दि. 28/01/2025 ते दि. 28/06/2025
दि. 30/08/2025 ते दि. 26/11/2025
राजकारण, समाजकारण, सामाजिक जीवन, बँकिंग, सहकार, शैक्षणिक क्षेत्र या द़ृष्टीने धनु राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक आहे. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात सुयश लाभेल, प्रतिष्ठा लाभेल, मानसन्मानाचे योग येतील. काहींना अधिकारपद लाभेल. धनु राशीच्या व्यक्ती या सामान्यत: सत्यप्रिय असतात त्यामुळे सार्वजनिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रांत त्यांना बर्यापैकी सन्मान लाभत असतो. समाजात अशा व्यक्तींचे वजन असते. सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था यामध्ये धनु राशीच्या व्यक्ती पुढे येतात.
मान, प्रतिष्ठेसाठी चांगला कालखंड
दि. 14/04/2025 ते दि. 16/05/2025
दि. 07/06/2025 ते दि. 27/07/2025
दि. 16/08/2025 ते दि. 02/10/2025
धनु राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या द़ृष्टीने हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे आहे. आरोग्य चांगले राहिले तरी जबाबदारी वाढणार आहे. नोकरी, व्यवसाय, कौटुंबिक जीवन या सर्व ठिकाणी आपली जबाबदारी वाढणार आहे. कामाचा ताण वाढणार आहे, दगदग वाढणार आहे. आर्थिक लाभाच्या द़ृष्टीने हे वर्ष समाधानकारक आहे. संपूर्ण वर्षभर कितीही अडचणी आल्या, चढ-उतार झाले तरीही तुमची आर्थिक प्रगती वर्षभर समाधानकारक राहणार आहे.