

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : एखादी रखडलेली गोष्ट मार्गी लागू शकते. नवीन व्यक्तीची भेट विचारांना वेगळी दिशा देईल. कामात घाईपेक्षा योग्य क्षणाची वाट पाहा.
वृषभ : पैशांपेक्षा वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरेल. जुन्या ओळखीतील व्यक्तीकडून अनपेक्षित मदत मिळू शकते. तुमचे मत निर्णायक ठरेल.
मिथुन : छोटासा संवाद गैरसमज दूर करू शकतो. नवीन कल्पना मांडण्यासाठी दिवस अनुकूल. तुमच्या निरीक्षणशक्तीचे कौतुक होईल.
कर्क : भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. जुन्या आठवर्णपिक्षा नव्या संधींकडे लक्ष द्या. कामात जबाबदारी वाढेल, त्यातून प्रतिष्ठाही मिळेल.
सिंह : नेतृत्वगुणांची परीक्षा होईल. इतरांना आदेश देण्यापेक्षा त्यांना सोबत घेणे परिणामकारक ठरेल. श्रेय वाटून घ्यायला विसरू नका.
कन्या : बारकाईने केलेले काम भविष्यात मोठा फायदा देऊ शकते, व्यवहार तपासूनच अंतिम निर्णय घ्या. योग्य सूचना देणे हिताचे ठरेल.
तूळ : दोन पर्यायांमध्ये अडकलेले मन एका बाजूला झुकू शकते. नात्यांमध्ये तणाव कमी होईल. व्यवहारात समजूतदार भूमिका लाभदायी ठरेल.
वृश्चिक : गुप्तपणे केलेली तयारी उपयोगी पडेल. एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यापेक्षा तिच्या कृतीकडे लक्ष द्या. निर्णयावर समाधान वाटेल.
धनू : चौकटीबाहेर विचार करण्याची संधी मिळेल. प्रवास, शिक्षण, नवीन अनुभवाची चर्चा पुढे जाऊ शकते. अडचण आली तरी पर्याय सापडेल.
मकर : जबाबदाऱ्यांना प्राधान्यक्रम द्या. वरिष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. पैशांबाबत बचतीचा एखादा नवीन विचार मनात येईल.
कुंभ : तुमची वेगळी कल्पना इतरांचे लक्ष वेधून घेईल. जुनी पद्धत बदलण्याची योग्य वेळ ओळखा. मनातील गोष्ट बोलल्याने हलके वाटेल.
मीन : अंतर्मनाचा आवाज दुर्लक्षित करू नका. नात्यातील दुरावा कमी करण्याची संधी मिळेल. सर्जनशील कामासाठी दिवस अनुकूल आहे.