रक्षाबंधन | ९० वर्षांनंतर ४ शुभयोग एकाच दिवशी; जाणून घ्या रक्षाबंधनाचा मुहूर्त

Rakshabandhan | रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ असतो, या कालवधित राखी बांधली जात नाही
Rakshabandhan
यंदा रक्षाबंधन दिवशी चार शुभयोग साकारत आहेत.Creative Commons Attribution-Share Alike 4.0
Published on
Updated on

रक्षाबंधन हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा उत्सव आहे. भाऊ आणि बहीण यांच्यातील प्रेमाचा हा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. संपूर्ण भारतात रक्षाबंधनाचा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. या वर्षी हा सण १९ ऑगस्टला असून या दिवशी काही विशेष योग साकारत आहेत.

रक्षाबंधनाचा मुहूर्त

Raksha Bandhan
रक्षाबंधनच्या दिवशी भद्रा काळ असतो. या कालावधित राखी बांधली जात नाहीCreative Commons Attribution-Share Alike 4.0

हिंदू पंचांगानुसार प्रत्येक श्रावणातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी हा उत्सव १९ ऑगस्टला असेल. तुम्हाला माहितीच असेल की या दिवशी भद्रा काळही असतो, आणि कालावधित राखी बांधली जात नाही. हे लक्षात घेऊन रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त देण्यात आलेला आहे.

भद्रा काळ : १८ ऑगस्टला रात्री २ वाजून २१ मिनिटांपासून ते १९ ऑगस्टला दुपारी १ वाजून २४ मिनिटांपर्यंत भद्रा काळ आहे.

राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त : १९ ऑगस्टला दुपारी १ वाजून २६ मिनिटं ते सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांपर्यंत राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी आहेत हे ४ शुभ योग

या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी ४ शुभ असे महायोग आहेत. हे महायोग जीवनात सुखसमृद्धी घेऊन येतील. विशेष म्हणजे हे संयोग तब्बल ९० वर्षांनी जुळून आलेला आहे.

सर्वार्थ सिद्धी योग : सर्वार्थ सिद्धी योग शुभ कार्यांसाठी अतिशय लाभदायी मुहूर्त मानला जातो. हा शुभयोग १९ ऑगस्टला सकाळी ८ वाजून ४० मिनिटांपर्यंत असेल.

रवियोग : रवियोग हा शुभकार्यासाठी लाभदायक योग मानला जातो.

शोभन योग : शोभन योग शुभता आणि सौंदर्य यांचे प्रतीक आहे.

श्रवण नक्षत्र : हे नक्षत्र शुभ कार्यांसाठी महत्त्वाचे मानले जाते.

रक्षाबंधनांचे महत्त्व

रक्षाबंधनाचे महत्त्व फक्त धार्मिक अनुष्ठान इतकेच मर्यादित नाही. भाऊ आणि बहीणचे नाते दृढ करण्यासाठी आणि एकमेकांबद्दल प्रेम आणि सन्मानाचे प्रतीक म्हणून या उत्सवाकडे पाहिले जाते. या उत्सवाशी संबंधित काही पौराणिक कथाही आहेत.

Rakshabandhan
रक्षाबंधनाचे महत्त्व धार्मिक उत्सव यापेक्षाही जास्त आहे.Photo by Extro Vision: https://www.pexels.com/photo/rakhi-on-white-cloth-12992568/

रक्षाबंधनाचे नियम

रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ असतो. या काळात राखी बांधने वर्जित असते. या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे १९ ऑगस्टला १ वाजून २४ मिनिटांपर्यंत भद्रा काळ आहे. त्यामुळे भद्रा काळ संपल्यानंतर रक्षाबंधनाचा मुहूर्त असेल. त्यामुळे बहिणींनी भद्रा काळ संपल्यानंतर भावाला राखी बांधावी.

Rakshabandhan
श्रीकृष्णाने मोहिनीचे रूप का घेतले? पांडवांसाठी इरावण बळी का गेला?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news