Rahu Gochar 2026: २०२६ मध्ये शनीच्या राशीत राहूचा प्रवेश; 'या' २ राशींच्या आयुष्यात येणार संकटांच वादळ!

Astrology Predictions 2026: राहूच्या स्थितीनुसार नवीन वर्ष २०२६ हे दोन राशींसाठी अत्यंत कठीण जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, २०२६ मध्ये राहू शनीच्या राशीत प्रवेश करणार आहे. जाणून घ्या विशेष उपाय.
Rahu Gochar 2026
Rahu Gochar 2026file photo
Published on
Updated on

Rahu Gochar Astrology predictions 2026

नवी दिल्ली : राहूच्या स्थितीनुसार नवीन वर्ष २०२६ हे दोन राशींसाठी अत्यंत कठीण जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, २०२६ मध्ये राहू शनीच्या राशीत प्रवेश करणार आहे. ५ डिसेंबर २०२६ रोजी राहू शनीच्या कुंभ राशीतून बाहेर पडून शनीच्याच मालकीच्या मकर राशीत प्रवेश करेल. ज्योतिषांच्या मते, हे गोचर दोन राशींसाठी कष्टदायक ठरू शकते. या राशींना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो आणि खर्चात अचानक होणारी वाढ त्यांचे बजेट बिघडवू शकते. जाणून घ्या या राशींबद्दल.

मकर रास

नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला अत्यंत सावधगिरीने निर्णय घ्यावे लागतील. सहकारी किंवा वरिष्ठांशी वाद आणि मतभेद होण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव वाढू शकतो. पैशांच्या बाबतीत मोठे नुकसान सोसावे लागू शकते. कर्ज, उधारी आणि गुंतवणूक यांसारख्या बाबींकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल. शॉर्टकट मार्गाने पैसे कमावण्याच्या नादात तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. जुगार, सट्टा किंवा शेअर मार्केटमध्ये नशीब आजमावणे टाळावे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे आणि चुकीच्या संगतीपासून दूर राहणे खूप गरजेचे असेल.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांची स्थिती देखील साधारण अशीच असणार आहे. कुंभ राशीतील राहूचा प्रभाव राग, चुकीचे निर्णय आणि घाईघाईला प्रोत्साहन देईल. आळस, राग, अहंकार आणि कटू वाणी हे तुमचे सर्वात मोठे शत्रू ठरतील. या दुर्गुणांमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. या काळात तुम्हाला व्यावसायिक आघाडीवर दबाव जाणवू शकतो. आर्थिक आणि वैयक्तिक पातळीवर आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या वैवाहिक जीवनावरही या गोचरचा परिणाम दिसून येईल. जोडीदाराशी वाद आणि भांडणे वाढू शकतात. घरात सुख-शांती टिकवून ठेवणे तुमच्यासाठी मोठे आव्हान असेल.

उपाय

ज्या लोकांना राहूमुळे जास्त त्रास होत आहे, त्यांनी काही विशेष उपाय नक्कीच करून पाहावेत:

  • ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार राहूशी संबंधित कोणतेही रत्न परिधान करा.

  • राहू शनीच्या राशीतच राहणार असल्याने दानधर्म आणि गरिबांना मदत केल्याने तुमचे कल्याण होऊ शकते.

  • प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर जल आणि काळे तीळ अर्पण करा.

  • यानंतर “ॐ रां राहवे नमः” या मंत्राचा १०८ वेळा जप करा. तुमच्या मार्गातील प्रत्येक अडथळा आपोआप दूर होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news