Maa Kaalratri: नवरात्रीचा सातवा दिवस: देवी कालरात्रीची पूजा का केली जाते? जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक मान्यता

भयकारी रूप, गाढव वाहन आणि शुभफल देणारी ‘शुभंकरी’; कालरात्री देवीच्या पूजेचे महत्त्व, स्वरूप आणि उपासनेची परंपरा
Goddess Kaalratri
Goddess KaalratriPudhari
Published on: 
Updated on: 

दुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी साथकाचे मन 'सहार 'चक्रात स्थिर झालेले असते. यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धींचे दरवाजे उघडू लागतात.

या चक्रात स्थिर झालेल्या साधकाचे मन पूर्णतः कालरात्रीच्या रूपाकडे आकर्षित झालेले असते. तिच्या साक्षात्कारापासून मिळणाऱ्या पुण्याचा तो भागीदार होतो. त्याच्या संपूर्ण पापांचा नाश होतो. त्याला अक्षय पुण्य लोकांची प्राप्ती होते. या देवीचा रंग काळा आहे. डोक्यावरील केस विस्कटलेले आहेत. गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे.

तिला तीन डोळे आहेत. हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत. ते चमकदार आहेत. कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्चासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात. गाढव हे कालरात्री देवीचे वाहन आहे. वर उचललेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर प्रदान करते. उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात खड्ग (कटधार) आहे.

कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयकारी आहे. परंतु, ती नेहमी शुभफळ देणारी असल्यामुळे तिचे नाव 'शुभकारी' सुद्धा आहे. यामुळे भक्ताने भयभीत होण्याचे काहीही कारण नाही. देवी कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे. राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात. ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी आहे.

या देवीचे भक्त पूर्णतः भयमुक्त असतात. कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचे पूर्ण पालन केले पाहिजे. मन, वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे, ती शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने होणाऱ्या शुभकामांची गणना केली जाऊ शकत नाही. आपण नेहमी तिचे स्मरण आणि पूजा केली पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news