Moonga Ratna: नशीब बदलणारे मूंगा रत्न कोणी परिधान करावे?

ज्योतिषशास्त्रात प्रवाळ (मूंगा) रत्नाला विशेष महत्त्व दिले जाते. ऊर्जा, धैर्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानलं जाणारे हे रत्न भगवान हनुमान आणि मंगळ ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते.
Moonga Ratna
Moonga Ratnafile photo
Published on
Updated on

Moonga Ratna

नवी दिल्ली: ज्योतिषशास्त्रात प्रवाळ (मूंगा) रत्नाला विशेष महत्त्व दिले जाते. ऊर्जा, धैर्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानलं जाणारे हे रत्न भगवान हनुमान आणि मंगळ ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते. योग्य पद्धतीने धारण केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते. मात्र, हे रत्न घालताना ठरावीक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांच्या कुंडलीत मंगळ ग्रह दुर्बल असतो, त्यांना प्रवाळ (मूंगा) रत्न परिधान करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे आत्मविश्वास वाढतो, भीती कमी होते आणि व्यक्ती अधिक निर्णयक्षम बनते असे मानले जाते.

Moonga Ratna
Bhagavad Gita: यश आणि आनंदासाठी भगवद्गीतेतील 'हे' उपदेश माहीत आहेत का? बदलून जाईल तुमचं आयुष्य!

कोणत्या राशींना मूंगा रत्न सर्वाधिक शुभ?

मेष रास: मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह असल्याने या राशीच्या व्यक्तींना मूंगा रत्न अत्यंत लाभदायक मानले जाते. यामुळे आरोग्य सुधारते, कामाच्या ठिकाणी नेतृत्व क्षमता वाढते आणि काही प्रमाणात मंगळ दोषाचा प्रभावही कमी होतो, असे मानले जाते.

वृश्चिक रास: वृश्चिक राशीवरही मंगळाचेच आधिपत्य असल्याने या राशीसाठी मूंगा रत्न विशेष फलदायी ठरतो. यामुळे मानसिक स्थैर्य मिळते, भीतीवर मात करण्याची शक्ती वाढते तसेच कामाच्या क्षेत्रात यश आणि आर्थिक प्रगती मिळू शकते, असे सांगितले जाते.

मूंगा रत्न धारण करताना ‘हे’ नियम महत्त्वाचे

शास्त्रानुसार नियमांचे पालन न केल्यास रत्नाचा अपेक्षित लाभ मिळत नाही. प्रवाळ (मूंगा) रत्न मंगळवारी धारण करणे शुभ मानले जाते. तो सोने, तांबे किंवा अन्य धातूमध्ये जडवून परिधान केला जातो. हा रत्न उजव्या हाताच्या अनामिका बोटात घालण्याची परंपरा आहे. ज्योतिषशास्त्रात रत्न धारण करण्यासाठी योग्य पद्धती आणि नियमांचे विशेष महत्त्व सांगितले आहे.

टीप: ही केवळ सामान्य माहिती असून पारंपरिक मान्यता आणि ज्योतिषीय मतांवर आहे.

Moonga Ratna
Adhik Maas 2026: आजपासून अधिक मास सुरू; पुढील ३० दिवस चुकूनही 'या' गोष्टी करू नका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news