

Margashirsha Month 2026: सनातन धर्मात प्रत्येक महिन्याचे काही ना काही धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व सांगितलं आहे. मार्गशीर्ष महिन्याला देखील हिंदू धर्मानुसार एक वेगळे धार्मिक महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णांचा सर्वात आवडता महिना मानला जातो. या महिन्यात भगवान विष्णू आणि महालक्ष्मीच्या वृत आणि पूजेला जास्त महत्व असतं. तसेच या महिन्यात गीता पाठ, मंत्रोच्चार पवित्र स्नान करणे आणि दान करणे देखील शुभ मानले गेले आहे. या महिन्यातील उत्तर भारतातील आणि महाराष्ट्रातील प्रथा वेगवेगळ्या आहेत.
धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिन्यात भक्तीभावाने पूजा करण्याला विशेष महत्व आहे. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा आणि त्यांचे स्मरण करण्याने मनाला शांती लाभते अशी मान्यता आहे. या काळात लवकर उठून स्ना करणे, भगवान विष्णूची पुजा करणे, गरजूंना दान करणे शुभ मानले गेले आहे. तसेच काही कार्य आहेत जी करणे टाळण्याचा देखील सल्ला दिला जातो.
मार्गशीर्ष महिन्यात सात्विक आहार घ्यावा अशी मान्यता आहे. या काळात मांसाहार, मद्य आणि अंमली पदार्थांचे सेवन करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. अनेक लोक कांदा आणि लसून देखील सेवन करणं टाळतात. या महिन्यात आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे.
मार्गशीर्ष महिन्यात आपल्या व्यवहारावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कोणाला वाईट बोलणे, कोणाचे मन दुखावणे, दुबळ्या लोकांना त्रास देणे यापासून लांब राहिले पाहिजे. घरातील वयोवृद्ध, आई-वडील आणि गुरूजनांचा सन्मान करण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या कोणत्याही बोलण्याने दुःख पोहचू नये याचा प्रयत्न करावा.
मार्गशीर्ष महिन्यात खोटे बोलणे, कोणाला फसवणे आणि दुसऱ्याचा हक्क हिरावून घेण्यापासून दूर राहिलं पाहिजे. भगावन श्री कृष्णांनी देखील गीता मध्ये चांगले कर्म करण्याची शिकवण दिली आहे. या महिन्यात आपण इमानदारीने पैसे कमवले पाहिजेत. कोणाला धोका देऊ नये. गरजवंतांना मदत करावी.