Mangal Nakshatra Parivartan 2026: मंगळ आपली चाल बदलणार... हे नक्षत्र परिवर्तन कोणात्या राशीच्या लोकांना लाभणार?

Mangal Nakshatra Parivartan 2026
Mangal Nakshatra Parivartan 2026pudhari
Published on
Updated on

Mangal Nakshatra Parivartan 2026: ग्रहांची चाल बदलणे हे ज्योतिष शास्त्रात अत्यंत महत्वाचे मानले गाते. ग्रहाचे राशी परिवर्तन आणि तसेच त्यांचे नक्षत्र परिवर्तन हे त्या राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रभाव पाडतात अशी धारणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच असे एक मोठे रक्षत्र परिवर्तन होणार आहे. मंगळ नक्षत्र परिवर्तन होणार आहे. मंगळ २ सप्टेंबर २०२६ ला गुरूचे स्वामित्व असलेल्या पुरर्वसु नक्षत्रात प्रवेश करणार आहे. २४ सप्टेंबर पर्यंत मंगळ या नक्षत्रात विराजमान असणार आहे. त्यामुळं मंगळ आणि गुरूची ही स्थिती काही राशींना अत्यंत लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या काळात करियअर, संपत्ती, उद्योग याबाबत लाभकारक योग निर्माण होण्याची शक्यता आहे.

Mangal Nakshatra Parivartan 2026
Rashi Bhavishya Today: आज 'या' राशीच्या व्यक्तींनी आर्थिक व्यवहारात घाई टाळा; पाहा १२ राशींचे अचूक भविष्य

मेष राशी

मंगळाचे नक्षत्र परिवर्तन मेष राशीच्या लोकांना आर्थिक स्वरूपात चांगला काळ घेऊन येण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना विस्ताराची संधी मिळणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना देखील आपल्या कामात यश मिळेल. कुटुंबाकडून देखील एक चांगली बातमी मिळू शकते. अनेक दिवसांपासून प्रयत्न करत असलेल्या कामात सकारात्मक रिझल्ट मिळतील.

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांना मंगळाचे हे नक्षत्र परिवर्तन अनेक गोष्टीत लाभ देणार आहे. कुटुंबाशी निगडीत जुनी समस्या सुटेल. पितृत संपत्तीशी निगडीत लाभ मिळू शकतो. जमीन, घर किंवा वाहन खरेदाचा योग आहे. करिअरमध्ये कोणत्या तरी प्रभावशाली व्यक्तीचा सहयोग मिळेल.

Mangal Nakshatra Parivartan 2026
Shani Gochar 2026 : शनीची कृपादृष्टी! ‘या’ 3 राशींचे नशीब पालटणार, वर्षाचे शेवटचे ४ महिने ठरणार खास

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांना मंगळ नक्षत्र परिवर्तन यशाचे मार्ग खुले करून देण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी कमी होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदारी मिळण्याचा योग देखील आहे. अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाच्या स्तुती होऊ शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते.

धनु राशी

धनु राशीच्या लोकांना हा काळ शुभ असणार आहे. कोणत्यातरी महत्वाच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. जोडीदार आणि कुटुंबाकडून चांगले सहकार्य लाभणार आहे. पैशाशी निगडीत प्रकरणात स्थिती पहिल्यापेक्षा चांगली होऊ शकते. गुंतवणूकीच्या नव्या संधी मिळतील. दीर्घ काळापासून अडकलेला पैसा परत मिळाल्यामुळं दिलासा मिळेल.

Mangal Nakshatra Parivartan 2026
Surya Gochar 2026 : पुढील २६ दिवस 'या' ४ राशींसाठी ठरू शकतात त्रासदायक!

मीन राशी

मंगळ ग्रहाचे पुनर्वसु नत्रात जाण्याने मीन राशीच्या लोकांवर याचा सकारात्मक प्रभाव पडणार आहे. व्यवसायात विस्ताराची संधी मिळणार आहे. कामकाजात येणारे अडथळे जूर होण्याने मानसिक तणाव कमी होणार आहे. नोकरी आणि रोजगाराशी निगडीत प्रकरणात देखील यश मिळण्याचा योग आहे. याकाळात खास व्यक्तीची ओळख देखील आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

ज्योतिष शास्त्रात मंगळ ग्रह हा साहस, उर्जा, जमीन, संपत्ती आणि पराक्रम याच्याशी निगडीत मानला जातो. तर पुनर्वसु नक्षत्राचा स्वामी ग्रह गुरू आहे. मंगळ पुनर्वसु नत्रज्ञात आल्यामुळं काही राशींसाठी ही नवी सुरूवात आणि प्रगतीचा काळ असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news