Mahashivratri Date 2026 | महाशिवरात्री नेमकी कधी 15 की 16 फेब्रुवारी? जाणून घ्या 2026 चे पंचांगानुसार उत्तर

Mahashivratri Date 2026 | उपवास, पूजा आणि जागरण कोणत्या दिवशी करावे? जाणून घ्या अचूक तारीख
Mahashivratri Date 2026
Mahashivratri Date 2026
Published on
Updated on
Summary
  1. 2026 साली महाशिवरात्रीच्या तारखेबाबत भक्तांमध्ये संभ्रम

  2. चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारी सायंकाळी सुरू

  3. उदय तिथीनुसार महाशिवरात्री 15 फेब्रुवारीलाच

  4. रात्रभर जागरण व शिवपूजेला विशेष महत्त्व

  5. प्रदोषकाळ व मध्यरात्री पूजा अधिक फलदायी मानली जाते

महादेवाची कृपा मिळवण्यासाठी शिवभक्त वर्षभर ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात, तो दिवस म्हणजे महाशिवरात्री. या दिवशी महादेवाची पूजा, उपवास आणि रात्रभर जागरण करण्याला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यात येणारी महाशिवरात्री शिवभक्तांसाठी केवळ धार्मिक सण नसून आत्मिक साधनेचा दिवस मानला जातो. अनेक जण या दिवशी उपवास, जप, ध्यान आणि शिवपूजा करतात. मात्र 2026 साली महाशिवरात्री कोणत्या दिवशी आहे, याबाबत भक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 15 फेब्रुवारी की 16 फेब्रुवारी नेमकी कोणती तारीख योग्य आहे, हे पंचांगानुसार स्पष्ट झाले आहे.

Mahashivratri Date 2026
electrolyte powder myth| व्यायामानंतर 'इलेक्ट्रोलाइट' पिताय? तुमचे कष्टाचे पैसे पाण्यात जातायत! जाणून घ्या संशोधकांचा खुलासा

पुराणकथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. शिवभक्तांसाठी हा दिवस श्रद्धा, संयम आणि भक्तीचे प्रतीक आहे. महाशिवरात्रीला देशभरातील शिवमंदिरांमध्ये विशेष सजावट केली जाते. शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र अर्पण करण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी उसळते. अनेक भक्त या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करून रात्री शिवपूजा करतात.

महाशिवरात्री 2026 : तारीख आणि तिथी

हिंदू पंचांगानुसार महाशिवरात्रीची चतुर्दशी तिथी पुढीलप्रमाणे आहे—

  • तिथी सुरू : 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजून 4 मिनिटांनी

  • तिथी समाप्त : 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजून 34 मिनिटांनी

उदय तिथीचा विचार करता महाशिवरात्री 15 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे उपवास, पूजा आणि जागरण हे सर्व विधी 15 तारखेलाच करणे योग्य ठरेल.

महाशिवरात्रीचे पूजेसाठी शुभ मुहूर्त

महाशिवरात्रीच्या रात्री शिवपूजेला विशेष महत्त्व असते. या दिवशी खालील वेळेत पूजा करणे शुभ मानले जाते—

  • सायंकाळी 6.11 ते रात्री 9.22

  • रात्री 9.23 ते मध्यरात्री 12.34

या काळात शिवलिंगाचा अभिषेक, मंत्रजप आणि आरती केल्यास विशेष पुण्यफळ मिळते, अशी श्रद्धा आहे.

महाशिवरात्रीची तारीख कशी ठरते?

महाशिवरात्री हा सण चंद्राच्या तिथीनुसार साजरा केला जातो. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री मानली जाते. 2026 मध्ये ही चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुरू होऊन 16 फेब्रुवारी संध्याकाळपर्यंत राहणार आहे. मात्र हिंदू परंपरेत उदय तिथीला प्राधान्य दिले जात असल्याने महाशिवरात्री 15 फेब्रुवारी 2026 रोजीच पाळली जाणार आहे.

महाशिवरात्रीला रात्र का आहे महत्त्वाची?

महाशिवरात्रीच्या नावातच ‘रात्र’ हा शब्द असल्याने या दिवशी रात्रीची पूजा विशेष फलदायी मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या रात्री भगवान शंकर ध्यानस्थ अवस्थेत असतात. त्यामुळे या काळात केलेली पूजा, मंत्रजप आणि शिवनामस्मरण लवकर फल देणारे ठरते, असे सांगितले जाते. म्हणूनच अनेक भक्त या दिवशी रात्रभर जागरण करतात

या दिवशी शिवभक्त काय करतात?

महाशिवरात्रीच्या दिवशी बहुतांश भक्त सकाळपासून उपवास करतात. काही जण निर्जल उपवास करतात, तर काही फलाहार स्वीकारतात. दिवसभर शिवनामस्मरण, मंत्रजप, शिवपुराण किंवा शिवरात्रीची कथा वाचन केले जाते. संध्याकाळी आणि रात्री शिवलिंगावर जल, दूध किंवा पंचामृताने अभिषेक केला जातो. बेलपत्र अर्पण करून महादेवाची आरती केली जाते.

पूजेसाठी कोणता वेळ शुभ मानला जातो?

महाशिवरात्रीच्या रात्री प्रदोषकाळात आणि मध्यरात्रीच्या सुमारास पूजा करणे विशेष शुभ मानले जाते. या वेळेत शिवलिंगावर अभिषेक करून ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप केल्यास मानसिक शांती आणि इच्छापूर्ती मिळते, अशी श्रद्धा आहे.

Mahashivratri Date 2026
Brain injuries insights | मेंदूच्या दुखापतीच्या अंतरंगात...

महाशिवरात्री व्रत आणि पूजा कशी करावी?

महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. शक्य असल्यास पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालावे. घरातील देवघरात शिवलिंगावर जलाभिषेक करून भस्म लावावे आणि बेलपत्र अर्पण करावे. ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा किमान एक माळ जप करावा.

दिवसभर उपवास ठेवून वेळ मिळेल तेव्हा शिवनामस्मरण करावे. सायंकाळी प्रदोषकाळात पुन्हा शिवपूजा करावी. घरात चौरंगावर वस्त्र अंथरून शिवलिंगाची स्थापना करून अभिषेक करावा. त्यानंतर शिवरात्रीची कथा वाचावी, आरती करावी आणि रात्रभर शक्य असल्यास जागरण करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी महादेवाची पूजा करून उपवास सोडावा.

महाशिवरात्री हा केवळ सण नसून आत्मशुद्धी, भक्ती आणि श्रद्धेचा दिवस मानला जातो. या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा आणि व्रत महादेव निश्चितच स्वीकारतात, असा भक्तांचा विश्वास आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news