Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.
मेष : गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. मात्र अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घेवूनच निर्णय घ्या. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यातही तुमचे विशेष योगदान असेल. सार्वजनिक ठिकाणी वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तुम्ही तुमच्या कार्याला प्राधान्य द्या. थोडा वेळ ध्यान आणि चिंतनात व्यतित करा. घरातील ज्येष्ठांचा सन्मान करा.
वृषभ : आज आव्हानांचा सामना पूर्ण आत्मविश्वासाने कराल. प्रलंबित सरकारी काम प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने मार्गी लागले. पैशाशी संबंधित कोणतेही व्यवहार करू नका. शांतपणे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. चूक करण्यापेक्षा आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव कायम राहील.
मिथुन : आज कामाच्या अतिव्यस्ततेमधून स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ काढाल. काही महत्त्वाचे कौटुंबिक निर्णय घेण्यातही तुमची खूप मदत होईल. तरुणांना त्यांच्या करिअर परीक्षेत सकारात्मक परिणाम मिळू शकतात. कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्याचा धोका असल्याने हिशेब काळजीपूर्वक करा. कोणाशीही वाद घालू नका. राजकीय बाबतीत येणाऱ्या अडचणी दूर होतील. व्यवसायात अति कामामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होईल.
कर्क : ग्रहांची स्थिती चांगली होत आहे. आर्थिक नियोजनाशी संबंधित कोणतेही उद्दिष्ट सहज पूर्ण होईल. धार्मिक संस्थांमध्ये तुमचे निस्वार्थ योगदान तुमची प्रतिष्ठा वाढवेल. कोणत्याही नकारात्मक परिस्थितीचा शांतपणे सामना करा. राग आणि आक्रमकतेमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. कोणत्याही समस्येवर निर्णय घेताना विचारपूर्वकच घ्या.
सिंह : घरामध्ये काही बदल किंवा सुधारणेची योजना करत असाल तर हीच वेळ आहे. नियमांचे उल्लंघन करु नका. ध्येयपूर्तीकडे दुर्लक्ष होणार नाही याची तरुणांनी काळजी घ्यावी. नकारात्मक आणि चुकीच्या कामांपासून दूर राहा. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. घरातील वातावरण प्रसन्न राहील.
कन्या : आज मुलांचे प्रश्न चर्चेतून सोडवाल. ध्येयाप्रती बेफिकीर राहणे विद्यार्थी आणि तरुणांसाठी नुकसानकारक ठरेल. भावंडांशी असलेले वाद ज्येष्ठांच्या मदतीने सोडवता येतील. कामाच्या ठिकाणी केलेले बदल सकारात्मक परिणाम देऊ शकतात. घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आणि आपुलकी यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.
तूळ : तुमच्यासाठी सकारात्मक बदलांची वेळ येत आहे. काही अडचणीच्या वेळी नातेवाईकांचा पाठिंबा तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. सततच्या धावपळीतून आराम मिळेल. भावनिक होवून तुमच्या खासगी गोष्टी इतरांबरोबर शेअर करु नका. अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात. उत्पन्नाचे स्रोत कमी होतील. लवकरच परिस्थिती अनुकूल होईल.
वृश्चिक : आज संपर्क क्षेत्रातून फायदा होवू शकतो. कौटुंबिक आणि व्यवसायाच्या जबाबदाऱ्या तुम्ही योग्यरित्या हाताळू शकाल. तुमच्या मनात संशयाची भावना नातेसंबंध खराब करू शकते, याची जाणीव ठेवा. माध्यम, कला, प्रकाशन इत्यादी क्षेत्रात तुम्हाला चांगले यश मिळू शकते.
धनु : आज इतरांकडून मदतीची अपेक्षा करण्याऐवजी तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. आर्थिक गुंतवणुकीबाबत योजना मार्गी लागतील. घाई आणि निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकते, हे लक्षात ठेवा. व्यवहारात लवचिक राहा. महत्त्वाच्या कामांचे नियोजन दिवसाच्या सुरुवातीपासूनच करा. काही वेळा थकवा आणि नकारात्मकतेमुळे मनोबल कमी होऊ शकते.
मकर : आज सामाजिक आणि कौटुंबिक कार्यात तुमचे महत्त्वपूर्ण योगदान असेल. शांततेसाठी थोडा वेळ एकांतात व्यतित करा. यामुळे तुम्हाला तुमच्यामध्ये नवीन उर्जेचा प्रसार अनुभवण्यास मिळेल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना योग्य विचारमंथन आवश्यक आहे. व्यवसायाशी संबंधित योजना यशस्वी होतील.
कुंभ : आज घराशी संबंधित जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर वेळ जाईल. तुमची सकारात्मक आणि आश्वासक वृत्ती तुम्हाला समाजात आणि कुटुंबात आदर देईल. कठोर परिश्रमाच्या जोरावर युवक यश मिळवतील. विनाकारण इतरांच्या कामात ढवळाढवळ करू नका अन्यथा तुम्हाला टीकेला सामोरे जावे लागले.
मीन : ध्येय साध्य करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. एखादे महत्त्वाचे कार्य पूर्ण केल्याने मानसिक शांती लाभेल. एखाद्याची नकारात्मक कृती तुम्हाला भावनिकदृष्ट्या असुरक्षित बनवू शकते. कामाच्या पद्धतीत बदल सकारात्मक राहील. दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी कुटुंबासोबत थोडा वेळ घालवा. ताणतणाव टाळा.