आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शुक्रवार, १४ जून २०२४

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on
Updated on

[author title="चिराग दारूवाला :" image="http://"][/author]

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : भविष्‍यातील योजना तयार करण्यासाठी अनुकूल काळ आहे

आज सामाजिक कार्यात सहभागी व्‍हाल. अनेक प्रश्न सुटतील. भविष्‍यातील योजना तयार करण्यासाठी अनुकूल काळ आहे, असे श्रीगणेश सांगतात. तुमच्या नातेसंबंधांकडे लक्ष देण्याबरोबरच तुमच्या वैयक्तिक कामाकडे लक्ष देणे आवश्यक आहे; जास्त कामाचा भार आणि व्यस्ततेमुळे चिडचिड होऊ शकते. व्यवसाय वाढवण्यासाठी तसेच नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना असेल तर मेहनतीबरोबरच काळजीपूर्वक निर्णय घ्‍यावे लागतील.

वृषभ : तुम्ही घेतलेले निर्णय सकारात्मक आणि फायदेशीर ठरतील

कुटुंबासोबत धार्मिक आणि मनोरंजनाशी संबंधित कार्यक्रमाचे नियोजन असेल. तुम्ही घेतलेले निर्णय सकारात्मक आणि फायदेशीर ठरतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत मिळेल. समस्या शांततेने सोडवा, रागवर नियंत्रण ठेवा. व्यवसायात नवीन उपक्रम पुढे ढकलून सद्यस्थितीवर लक्ष केंद्रित करा,अशी सूचना श्रीगणेश करतात. वैवाहिक जीवन सामान्य राहील. हवामानातील बदलाचा आरोग्‍यावर परिणाम होईल.

मिथुन : वैयक्तिक गोष्टी इतरांसोबत शेअर केल्यास नुकसान होवू शकते

श्रीगणेश म्‍हणतात की, भावनेच्या भरात काही निर्णय चुकण्‍याची शक्‍यता आहे. वैयक्तिक गोष्टी इतरांसोबत शेअर केल्यास नुकसान होवू शकते. रूटीनमध्ये थोडा बदल करण्याचा प्रयत्न करा. मुलांसोबत वेळ व्‍यतित केल्‍याने त्यांचे मनोबल वाढेल. व्यावसायिक बाबींमध्ये कोणतेही बदल करू नका; समस्यांवर उपाय शोधा. कुटुंबात शांततापूर्ण वातावरण राहील.

कर्क : व्यवसाय वाढवण्यासाठी जनसंपर्कफायदेशीर

श्रीगणेश सांगतात की, आज नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल, संपर्क क्षेत्रात वाढ होईल. व्यक्तिमत्व सुधारेल. कुटुंबात बाहेरच्या लोकांच्या हस्तक्षेपामुळे घरातील शांतता प्रभावित होऊ शकते; तरुण ध्येयापासून विचलित होऊ शकतात. व्यवसाय वाढवण्यासाठी जनसंपर्कफायदेशीर ठरेल.

सिंह: संपर्क आणि विपणन संबंधित कामात फायदा होण्याची शक्यता

जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन आणि संतुलित विचारसरणीमुळे अनेक प्रश्‍न मार्गी लागतील, असे श्रीगणेश सांगतात. नातेवाईकांशी संबंध गोड ठेवा. कोणताही व्यवसाय करार अंतिम करताना काळजी घेणे आवश्यक आहे, संपर्क आणि विपणन संबंधित कामात फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबात सकारात्मक वातावरण राहील.

कन्या : तुम्हाला नवीन माहिती शिकायला मिळेल

श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्ही तुमच्या नकारात्मक सवयी सोडण्याचा संकल्प कराल. तुमच्या आर्थिक धोरणांवर आत्मविश्वासाने काम करा. आळसात वेळ वाया घालवू नका. तुमच्‍या पात्रतेवर विश्वास ठेवा. प्रभावशाली व्यावसायिक लोकांना भेटण्याची आणि संवाद साधण्याची संधी मिळेल. तुम्हाला नवीन माहिती शिकायला मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.

तूळ : ग्रहस्‍थिती सुखद आहे. दिनचर्या चांगली राहिल

श्रीगणेश सांगतात की, ग्रहस्‍थिती सुखद आहे. दिनचर्या चांगली राहिल. सर्व महत्त्वाची कामे हाताळण्यास सक्षम असाल. भावांसोबतचे संबंध मधुर होतील. तुमचे सर्वोत्तम प्रयत्न कामाच्या ठिकाणी अंतर्गत व्यवस्था सुधारतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृश्चिक : झटपट निर्णय घेतल्याने तुमचे काम वेळेवर पूर्ण होईल

तुमची कामे यशस्वी होतील, असे श्रीगणेश सांगतात. परिस्थितीनुसार झटपट निर्णय घेतल्याने तुमचे काम वेळेवर पूर्ण होईल. नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. जीवनात सर्वकाही असूनही शून्यतेची भावना असेल. स्वतःला व्यस्त ठेवा. व्यवसायात उत्पन्नाचे चांगले साधन असेल; सोबतच खर्चही वाढेल.

धनु : संगणक आणि माध्यमाशी संबंधित व्यवसायात नवीन संधी

श्रीगणेश म्‍हणतात की, भविष्यासाठी काही नियोजन केले असेल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. राग आणि घाई टाळा. तुमची ऊर्जा सकारात्मक ठेवा. आळस टाळा. संगणक आणि माध्यमाशी संबंधित व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये योग्य सामंजस्य आणि गोडवा राहील.

मकर : नोकरी शोधणाऱ्यांना यश मिळेल

श्रीगणेश सांगतात की, तुमची सकारात्मक विचारसरणी आणि नियोजनाने काम केल्याने तुमच्या कुटुंबाला नवे फायदे मिळतील. घरामध्ये वास्तूनुसार नियमांचे पालन करावे. आपल्या स्वभावाशी जुळवून घेण्याची काळजी घ्या. जास्त विचार केल्याने संधी गमावण्‍याची शक्‍यता. व्यवसायातील सहकारी आणि घरातील अनुभवी लोकांच्या निर्णयांना प्राधान्य द्या. नोकरी शोधणाऱ्यांना यश मिळेल.

कुंभ : आज विचारांमध्ये सकारात्मकता ठेवा

श्रीगणेश सांगतात की, आज विचारांमध्ये सकारात्मकता ठेवा. तुम्ही मानसिकदृष्ट्या शांत राहाल. दीर्घकालीन लाभाच्या योजनांवर कौटुंबिक चर्चा देखील होऊ शकते. कोणतीही अप्रिय माहितीचा कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्यावे.

मीन : तुमच्या वैयक्तिक बाबी उघड करू नका

श्रीगणेश म्हणतात की, सामाजिक किंवा राजकीय संबंधांद्वारे लाभ मिळेल. तुमच्या वैयक्तिक बाबी उघड करू नका. वादाच्या कोणत्याही परिस्थितीत आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायाशी संबंधित कोणतेही रखडलेले काम पुन्हा सुरू होईल आणि त्याचे सकारात्मक परिणाम होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news