

Horoscope
चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.
श्रीगणेश म्हणतात की, आज ग्रहस्थिती अनुकूल आहे. पूर्ण आत्मविश्वासाने आणि क्षमतेने काम करा. जमीन खरेदी किंवा विक्री संबंधित व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आणि तरुणांना त्यांच्या कामातील अडचणींवर मार्ग सापडेल. आपल्या स्वभावात आणि दिनचर्येत बदल करणे आवश्यक आहे. स्पर्धकांच्या हालचाली दुर्लक्षित करू नका. पैशांच्या व्यवहारांबाबत काळजी घ्या.
श्रीगणेश सांगतात की, भविष्यातील उपक्रम सुरुवात करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. नकारात्मक परिस्थिती आल्यास, शांतपणे आणि समजूतदारपणे निर्णय घ्या, अन्यथा परिस्थिती बिघडू शकते. भावनेच्या आहारी न जाता व्यवहारी दृष्टीकोन ठेवल्यास परिस्थिती अनुकूल होईल. अनुभवी व्यक्तीशी चर्चा करणे फायदेशीर ठरेल. व्यवसायाशी संबंधित कामे वेळेवर पूर्ण होतील.
तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमचे काम नियोजनबद्धपणे पूर्ण करण्यात मदत करेल. कामाचा अतिरेक करू नका. अन्यथा सर्व कामे सांभाळणे कठीण होईल. घरगुती समस्या सोडवण्यात कुटुंबियांचा पाठिंबा मिळेल. व्यवसायसंबंधित कामे नेहमीप्रमाणे सुरळीत चालतील. पती-पत्नीमधील भावनिक नाते आणखी दृढ होईल.
श्रीगणेश म्हणतात की, आज कुटुंबातील ज्येष्ठांकडून तुम्हाला मिळालेला सल्ला भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. पूर्वीच्या चुका लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या दिनचर्येत योग्य बदल कराल. दिनचर्या नियमित ठेवा. भागीदारीशी संबंधित व्यवसाय गतीने पुढे नेण्यास योग्य वेळ आहे. पती-पत्नीच्या नात्यातील गोडवा कायम राहील.
मालमत्तेशी संबंधित प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जवळच्या नातेवाईकांची भेट आनंददायी ठरेल. घरातील सदस्याने घेतलेला ठाम निर्णय पूर्ण होईल. कोणताही आर्थिक व्यवहार करताना दक्षता घ्या, फसवणुकीची शक्यता आहे. कुठल्याही कामात जास्त विचार न करता त्वरित निर्णय घ्या. व्यवसायासंदर्भातील ठाम निर्णय लाभदायक ठरेल. कुटुंबात अति हस्तक्षेप करू नका, असा सल्ला श्रीगणेश देतात.
श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्ही प्रत्येक परिस्थितीत समतोल राखाल. नातेवाईक किंवा मित्राच्या समस्येचे निराकरण करण्यात मदत केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. कुटुंबियांसमवेत वेळ व्यतित कराल. दिलेले वचन पूर्ण करा अन्यथा तुमची प्रतिमा बिघडू शकते. मुलांना सकारात्मक कामात गुंतवा.
श्रीगणेश सांगतात की, आज एखाद्या विशेष कामाशी संबंधित योजना आज सुरू होतील. लोक काय म्हणतात याची चिंता न करता तुमच्या क्षमतेनुसार कामावर लक्ष केंद्रित करा. नक्कीच यश मिळेल. संयम आणि धैर्य आवश्यक आहे. घाई आणि निष्काळजीपणामुळे काम बिघडू शकते. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा, कारण अचानक मोठा खर्च होऊ शकतो. बहुतेक व्यवसायिक कामे सुरळीत पूर्ण होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.
आज तुम्ही जेवढे एकाग्रतेने आणि मेहनतीने कार्य कराल तेवढे यश मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात तुमचा सहभाग असेल. सध्या वैयक्तिक आयुष्यात कोणत्याही प्रकारचा धोका घेऊ नका,अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. घरातील वडिलधाऱ्यांचा सन्मान करा. कार्यस्थळी तुमची उपस्थिती आवश्यक असेल आणि सर्व कामांवर लक्ष ठेवा, असा असा सल्ला श्रीगणेश देतात.
श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही कामाच्या पद्धतीत योग्य बदल केला, तर काही काळापासून सुरू असलेल्या समस्या तुमच्या सकारात्मकतेमुळे सुटतील. स्वतःच्या निर्णयालाच प्राधान्य द्या. अहंकार व आत्मविश्वासाची अतिरेक ही नकारात्मक परिस्थिती ओढवू शकते. सध्या चालू असलेल्या कामात अडथळे येऊ शकतात, याची जाणीव ठेवा.
श्रीगणेश म्हणतात की, मालमत्ता किंवा वाहन खरेदीसंबंधी विचार करत असाल तर वेळ अनुकूल आहे. काही वेळ स्वतःच्या आवडत्या गोष्टींसाठी द्या, जेणेकरून अलीकडील थकवा दूर होईल. कोणतेही धोकादायक काम टाळा. निष्काळजीपणामुळे नियमभंग होण्याची शक्यता आहे. कायदेशीर अडचणीत अडकू शकता. दिनचर्या व्यवस्थित ठेवणे महत्त्वाचे आहे. व्यवसायात योग्य प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे.
श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस महिलांसाठी अतिशय यशस्वी ठरू शकतो. तुम्ही तुमच्या दिनचर्येत काही सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न कराल. एखाद्या जुन्या प्रकरणामुळे दिनचर्या विस्कळीत होऊ शकते, यासाठी सतर्क रहा. चुकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. व्यवसायात चांगली स्थिती आहे. पती-पत्नीमध्ये सहकार्याचे नाते निर्माण होईल.
श्रीगणेश म्हणतात की, अनुभवी लोकांच्या सान्निध्यात तुम्हाला काही सकारात्मक अनुभव मिळू शकतात. मालमत्तेशी संबंधित कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आहे. तरुणांना त्यांच्या भविष्यासंबंधी योजना साकार झाल्यामुळे समाधान वाटेल. कामाचा अतिरेक असल्यामुळे तुम्ही कुटुंबातील कामांकडे पूर्ण लक्ष देवू शकणार नाही. स्वतःसाठी वेळ काढणे गरजेचे आहे.