

Horoscope
चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.
श्रीगणेश म्हणतात की, प्रलंबित आर्थिक व्यवहार आज मार्गी लागतील. तुम्ही तुमचे विचार व कामगिरीद्वारे प्रभावीपणे स्वतःला व्यक्त करू शकाल. युवकांना त्यांच्या मेहनतीनुसार योग्य यश मिळेल. जमीनसंबंधी खरेदी-विक्रीपासून दूर राहा. उत्पन्न वाढले तरी खर्चही वाढणार आहे, याची जाणीव ठेवा. इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, फसवणूक होण्याची शक्यता आहे.
कुटुंबात आज एखाद्या महत्वाच्या कामाची योजना आखली जाईल. कौटुंबिक नात्यांच्या दृष्टीने होणाऱ्या चर्चांमध्ये तुमचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. आयुष्यात काही अचानक बदल घडू शकतात जे तुमच्यासाठी नशीबवान ठरतील. मुलांच्या नकारात्मक वर्तनामुळे चिंता निर्माण होऊ शकते. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण वागा. आज अनोळखी लोकांशी संपर्क टाळा. व्यवसायात तुमच्या योजना कोणालाही सांगू नका, असा सल्ला श्रीगणेश देतात.
राजकीय संपर्क तुम्हाला काही चांगल्या संधी देतील. महिलांसाठी आजचा दिवस शुभ आहे. त्यांची कौशल्ये व प्रतिभा त्यांना उद्दिष्टपूर्तीत मदत करतील. जुने नकारात्मक प्रसंग आजही त्रासदायक ठरू शकतात, त्यामुळे वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत ठेवावे. पती-पत्नी एकमेकांच्या भावना समजून घेतील.
आजचा दिवस आध्यात्मिक व धार्मिक कार्यात घालवला जाईल. जवळच्या नातेवाईकाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. अनुभवी लोकांच्या सहवासात तुमची कामगिरी व व्यक्तिमत्त्व अधिक उजळेल. तुमच्या योजना कोणापुढेही उघड करू नका. थकवा व आळसामुळे एखादे महत्वाचे काम चुकू शकते. संयम राखा, रागामुळे परिस्थिती बिघडू शकते. आज बहुतेक कामे फोन किंवा संपर्कातून होतील.
श्रीगणेश म्हणतात, आज मित्र-नातेवाईकांच्या भेटीगाठी व आनंदात वेळ जाईल. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस लाभदायक ठरू शकतो. जवळचा प्रवास घडू शकतो. इतरांच्या सल्ल्यापेक्षा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. घरातील सदस्याच्या तब्येतीची काळजी वाटू शकते. संपर्क क्षेत्रात वाढ होईल.
श्रीगणेश सांगतात की, आज अफवांकडे दुर्लक्ष करा. तुमच्या कामात निष्ठावान रहा, नक्कीच यश मिळेल. घरात मुलांच्या गोड बातमीची शक्यता आहे. मालमत्ता किंवा वाहनासाठी कर्ज घेण्याचा विचार असेल तर त्यावर पुन्हा विचार करा. अहंकार तुमचे लक्ष विचलित होवू शकते. त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवा.
श्रीगणेश म्हणतात की, आज धार्मिक यात्रेसंबंधी नियाजन कराल. युवकांनाही त्यांच्या मनातील संभ्रम दूर झाल्यावर निर्णय घेण्याचे धैर्य मिळेल. इतरांच्या हस्तक्षेपामुळे तुमचा दिनक्रम बिघडू शकतो. कोणताही निर्णय स्वतः घ्या. संवाद साधताना सौम्य राहा. व्यवसायासंबंधी एखादा प्रस्ताव मिळू शकतो.
कोणताही निर्णय घेण्याआधी योग्य चर्चा केल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने राहील. तुमच्या प्रयत्नांनुसार तुम्हाला योग्य फळ मिळेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याबाब चिंता वाटू शकते, त्यामुळे नात्यांमध्ये कटुता येऊ शकते. घरातील मोठ्यांचा सन्मान करा. आज मार्केटिंगशी संबंधित कामे टाळा. घरातील वातावरण आनंददायक राहील.
श्रीगणेश म्हणतात की, आज संपर्क क्षेत्रातून लाभ होईल. तुमचे व्यक्तिमत्त्व खुलून येईल. ग्रहांची अनुकूलता तुम्हाला यश मिळवून देईल. कोणत्याही बेकायदेशीर गोष्टीकडे आकर्षित होऊ नका, यामुळे मानहानी होऊ शकते. खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. विद्यार्थी मौजमजेच्या आहारी जाऊन लक्ष्यापासून भरकटू शकतात.
श्रीगणेश सांगतात की, आज काही आनंददायक घटना घडतील. तुमच्या गुणांचा विचार करा. घरात पाहुणे येऊ शकतात. जमिनीशी संबंधित कामात कागदपत्रांची नीट चौकशी करा. कोर्ट-कचेरी संबंधित बाबींसाठी एखाद्या हितचिंतकाचा सल्ला घ्या. व्यवसायात कर्मचारी वर्गाच्या सल्ल्यालाही महत्त्व द्या. घर व व्यवसाय दोन्ही ठिकाणी समतोल ठेवाल.
श्रीगणेश म्हणतात, कुटुंबातील सदस्याच्या यशामुळे घरात आनंदी वातावरण असेल. काही राजकीय व्यक्तींशी भेट होऊन तुमची लोकप्रियता वाढेल. पैशांच्या व्यवहारात अधिक काळजी घ्या, फसवणूक होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी घेतलेला ठाम निर्णय फायद्याचा ठरू शकतो. घरगुती बाबतीत हस्तक्षेप करू नका. आरोग्य चांगले राहील.
ग्रहस्थिती आज तुमच्यासाठी अनुकूल आहे. चातुर्यामुळे तुम्हाला निर्णायक यश मिळेल. एखाद्या धार्मिक स्थळी तुम्हाला सन्मान मिळण्याची शक्यता आहे. जवळच्या नातेवाईकांसोबत थोडा वेळ घालवा, नातेसंबंध सुधारतील. जुने नकारात्मक अनुभव मनात ठेऊ नका. इतरांच्या कामात अडकणे टाळा, अन्यथा तुमचे महत्वाचे काम थांबू शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद घालणे टाळा, असा सल्ला श्रीगणेश देतात.