Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.
मेष : श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही आपल्या कार्याप्रती समर्पित राहिल्याने यश मिळेल. खर्च आणि उत्पन्नात योग्य ताळमेळ राहील; खरेदी करताना निष्काळजीपणा करू नका. अन्यथा तुमची फसवणूक होवू शकते. मुलांकडे दुर्लक्ष करू नका. प्रॉपर्टीशी संबंधित व्यवसायात चांगला व्यवहार होण्याची शक्यता आहे.
वृषभ : श्रीगणेश म्हणतात की, आज दिवसाचा बहुतांश वेळ तुम्ही कुटुंबासोबत व्यतित कराल. तुम्ही सर्व कामे सहजतेने पूर्ण करू शकाल; पण इतरांच्या शब्दांवर आंधळेपणाने विश्वास ठेवणे हानिकारक ठरेल. सहनशक्ती ठेवा अन्यथा तुमची काही रहस्ये उघड होऊ शकतात. व्यवसायात कर्मचाऱ्यांचे योग्य सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद कायम राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.
मिथुन : आज थोडा वेळ एकांतात व्यतित करा. यामुळे तुमचे मनोबल वाढेल. एखादे मोठे कार्य पूर्ण केल्याने आनंद मिळेल. जवळच्या नातेवाईकांना अडचणीत मदत केल्याने तुम्हाला श्रेय मिळेल. चिडचिडेपणा टाळा. कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेताना कोणाचा तरी सल्ला घेणे उचित ठरेल, असा सल्ला श्रीगणेश देतात. काही दु:खद बातम्या मिळाल्याने मन उदास होऊ शकते.
कर्क : आज आव्हाने येतील; पण तुम्ही याला शांतपणे सामोरे जाल. कामांकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने तुमची कार्यक्षमताही वाढेल. योग्य यश मिळवण्याच्या उत्साहात भान हरवू नका. शेजारी तुमच्या प्रगतीचा हेवा करतील. घरात अचानक पाहुणे आल्याने काही महत्त्वाचे काम खोळंबू शकते. कार्यक्षेत्रातील व्यवस्थेत सुधारणा होईल.
सिंह : आज मागील काही दिवसांपासून प्रलंबित असणारे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या योजना सुरू करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, असे श्रीगणेश सांगतात. सामाजिक कार्यातही तुमचा सहभाग असेल. नातेवाईकाबद्दल दुःखद बातमी मिळाल्याने तुमच्या कामगिरीवर परिणाम होईल. चिडचिडेपणा टाळा, अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जास्त कामामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला योग्य वेळ देऊ शकणार नाही.
कन्या : आज तुम्ही एखादे काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करू शकाल. आर्थिक बाजू समाधानकारक राहील. काम आणि कौटुंबिक समतोल राखल्यास योग्य व्यवस्था होईल. कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित वाद असल्यास रागावर आणि आवेगावर नियंत्रण ठेवा. तुमच्या भावनांच्या जोरावर कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका, असे संकेत श्रीगणेश देतात. व्यवसायाशी संबंधित एखादे नवीन काम सुरू करण्याची योजना असेल.
तूळ : श्रीगणेश सांगतात की, राजकीय क्षेत्रात कार्यरत असणार्यांना आज मानाचे पद मिळण्याचा योग आहेत. तुम्हाला चांगली बातमी मिळेल. संपर्क क्षेत्रात वाढ होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. दुपारनंतर ग्रहांची स्थिती प्रतिकूल राहील. वैयक्तिक चिंता राहू शकते. यामुळे तुम्ही असहाय्य वाटू शकते
वृश्चिक : आज ग्रहमान अनुकूल आहे. ध्येयासाठी सतत प्रयत्नशील राहिल्यास यश मिळेल. नातेवाइकासोबत सुरू असलेले वाद मिटतील. जमीन खरेदीच्या विचारात असाल तर कागदपत्रे व्यवस्थित तपासा, असा सल्ला श्रीगणेश देतात. विश्वासू व्यक्तीशी संबंध तुटण्याची शक्यता आहे. आज तुम्ही दिवसभर कामात व्यस्त राहू शकता. संपत्तीबाबत भावांसोबतचे वाद शांततेने मिटवण्याचा प्रयत्न करा.
धनु : श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्ही ध्येयाप्रती समर्पित असाल. तुमच्या कर्तृत्वाची प्रशंसा होईल;पण घाई आणि निष्काळजीपणाने घेतलेल्या निर्णयांमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. जमिनीशी संबंधित वादामुळे मनावर तणाव राहिल. भागीदारीशी संबंधित व्यवसाय सुधारेल.
मकर : श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस संमिश्र आहे. तुम्ही दिवसभर सकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला यश मिळवून देईल. अध्यात्मिक कार्यक्रमातील सहभागाने मन उत्साही राहील. आर्थिक गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या. एखाद्या गोष्टीबद्दल मनात निराशा आणि नकारात्मक विचार येऊ शकतात. व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या.
कुंभ : जवळच्या नातेवाईकाच्या समस्या सोडवण्यात तुमची विशेष भूमिका असेल. तुमची संपर्कांची मर्यादा वाढेल, या संपर्कांचा फायदा घ्या. सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्या. वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नका; अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. आज सर्व कामे संयमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. भागीदारीशी संबंधित व्यवसायात पारदर्शक भूमिका महत्त्वाची राहिल.
मीन : श्रीगणेश सांगतात की, आज बहुतांश वेळ आवडत्या कामात व्यतित केल्याने तुम्हाला रोजच्या तणावातून आराम मिळेल. कौटुंबिक सुव्यवस्था राखण्यासाठी घरातील सर्व सदस्य एकत्रितपणे योजना आखतील. मुलांच्या संगतीवर लक्ष ठेवा. सध्या उत्पन्नाची स्थिती सामान्य राहील. सरकारी कामकाज पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.