Horoscope Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शुक्रवार, ४ ऑक्‍टोबर २०२४

जाणून घ्या आजचे राशिभविष्य
Horoscope Today
जाणून घ्या तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? | File Photo
Published on
Updated on

Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.

मेष : कौटुंबिक सुख आणि शांती हीच तुमची प्राथमिकता असेल

Daily Horoscope
मेष File Photo

मेष : श्रीगणेश सांगतात की, आज प्रलंबित असणारे सरकारी किंवा वैयक्तिक काम पूर्ण झाल्‍याने मन प्रसन्न राहील. कौटुंबिक सुख आणि शांती हीच तुमची प्राथमिकता असेल. मुलांच्या अभ्यासाबाबत किंवा करिअरबाबत चिंता वाढेल. अचानक खर्च वाढल्‍याने तुमच्‍या बजेटवर परिणाम होवू शकतो. सामाजिक कार्यात काम करताना नकारात्मक काम करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. व्यवसायात यश लाभेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

वृषभ : कोणतीही समस्या परस्पर सामंजस्याने सोडवाल

Daily Horoscope
वृषभFile Photo

वृषभ : श्रीगणेश म्‍हणतात की, कोणतीही समस्या परस्पर सामंजस्याने सोडवाल. जुने मतभेद आणि गैरसमज दूर होतील. व्यावसायिक अभ्यासासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. अनोळखी व्यक्तींशी संपर्क वाढवू नका. बाहेरच्या व्यक्तीला तुमच्या कुटुंबात ढवळाढवळ करू देऊ नका. व्यवसायात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. जोडीदाराच्या प्रकृतीत चढ-उतार होतील. अतिकामाचा आरोग्‍यावर नकारात्‍मक परिणाम होईल.

मिथुन : तणावाचा आरोग्यावर वाईट परिणाम होईल

Daily Horoscope
मिथुनFile Photo

मिथुन : श्रीगणेश सांगतात की, आज कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या विशिष्ट विषयावर चर्चा होऊ शकते. नातेवाइकांसोबतचा वाद कोणाच्या तरी मध्यस्थीने सोडवला जाऊ शकतो. अनेक बाबतीत संयम बाळगणे आवश्यक आहे. राग आणि घाईमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. घर-कुटुंब आणि व्यवसायात योग्य सामंजस्य राखले जाईल. तणावाचा आरोग्यावर वाईट परिणाम होईल.

कर्क : आर्थिक व्‍यवहार करताना कोणावरही विश्वास ठेवू नका

Daily Horoscope
कर्कFile Photo

कर्क : श्रीगणेश म्‍हणतात की, मुलांशी संबंधित विशेष काम पूर्ण केल्याने आराम मिळेल. वैयक्तिक कामांवर पूर्ण लक्ष द्या. आर्थिक व्‍यवहार करताना कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. अनावश्यक खर्चात कपात करा. विद्यार्थी आणि तरुणांना करिअरकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. व्यवसायात सर्व कामे गांभीर्याने करा. पती-पत्नीमधील मतभेद दूर होतील.

सिंह : कोणत्याही प्रकारचे कर्ज घेऊ नका

Daily Horoscope
सिंहFile Photo

सिंह : श्रीगणेश सांगतात की, आज मागील काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. तुम्हाला योग्य सल्ला मिळेल. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांना यश मिळू शकते. व्यवसायातील आर्थिक मंदीमुळे कुटुंबातील सदस्यांना खर्चात कपात करावी लागू शकते. कोणत्याही प्रकारचे कर्ज घेऊ नका. व्यवसायात गांभीर्याने काम करण्याची गरज आहे. पती-पत्नीचे नाते मधुर होऊ शकते. आरोग्य चांगले राहिल.

कन्या : व्यसनाधीन लोकांपासून दूर रहा

Daily Horoscope
कन्याFile Photo

कन्या : श्रीगणेश म्‍हणतात की, कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकाल. आर्थिक गुंतवणुकीबाबत वेळ अनुकूल आहे. नातेवाइकांशी पैशाबाबत व्यवहार करताना नात्यात दुरावा येणार नाही याची काळजी घ्या. व्यवसायाशी संबंधित तुमची कोणतीही कृती फायदेशीर ठरू शकते. वैवाहिक जीवन प्रेमाने भरलेले असेल. व्यसनाधीन लोकांपासून दूर रहा

तूळ : आज तुम्‍हाला फोन कॉलद्वारे एक महत्त्वाची सूचना मिळेल

Daily Horoscope
तूळ File Photo

तूळ : श्रीगणेश सांगतात की, धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यातही तुमचा सहभाग असेल. आज तुम्‍हाला फोन कॉलद्वारे एक महत्त्वाची सूचना प्राप्त होऊ शकते. त्याची तातडीने अंमलबजावणी करणे योग्य ठरेल. भविष्यातील कोणतीही योजना बनवताना इतरांपेक्षा तुमच्या निर्णयाला प्राधान्य द्या. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. जोडीदाराचे सहकार्य असेल. मायग्रेनचा त्रास असणार्‍यांनी काळजी घ्‍यावी.

वृश्चिक : वैयक्तिक कामांवर लक्ष केंद्रित करा

Daily Horoscope
वृश्चिकFile Photo

वृश्चिक : श्रीगणेश सांगतात की, काम करण्यापूर्वी त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंचा विचार करा. चुकीच्या कामांकडे लक्ष न देता वैयक्तिक कामांवर लक्ष केंद्रित करा. कोणतीही दीर्घकाळची चिंता आणि तणाव दूर होऊ शकतो. यावेळी जमीन खरेदीशी संबंधित कामांमध्ये जास्त लाभाची अपेक्षा करू नका. रागावर नियंत्रण ठेवा अन्‍यथा परिस्थिती बिघडू शकते. व्यवसायात क्षेत्राशी संबंधित योजना सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

धनु : तुमचा संशयास्पद स्वभाव इतरांसाठी त्रासदायक ठरु शकतो

Daily Horoscope
धनुFile Photo

धनु : श्रीगणेश सांगतात की, आज तुमचा बहुतांश वेळ हा घरगुती कामात जाईल. धार्मिक कार्यातील सहभागाने तुमचा आदरही वाढू शकतो. तुमचा संशयास्पद स्वभाव इतरांसाठी त्रासदायक ठरु शकतो. वेळेनुसार तुमच्या वागण्यात बदल करा. तुमच्या योजना राबविण्‍यासाठी वेळ अनुकूल आहे. नवीन कामही सुरू होईल. कुटुंबासोबत मनोरंजनात वेळ जाईल. जास्त प्रदूषित आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

मकर : आज तुम्हाला काही शुभ सूचना मिळू शकतात

Daily Horoscope
मकरFile Photo

मकर : आज जवळच्या नातेवाईकाची समस्या सोडवण्यात तुमचे विशेष योगदान असेल, असे श्रीगणेश सांगतात. तुमच्‍या हुशारी आणि कर्तृत्वाची प्रशंसा होईल. आज तुम्हाला काही शुभ सूचना मिळू शकतात. काही लोक तुमच्यासाठी त्रास देऊ शकतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलू नका. काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये सामंजस्य राखणे आवश्यक असेल. भागीदारीशी संबंधित व्यवसायात एकमेकांशी सुसंवाद राहील. पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतो. प्रकृती चांगली राहिल.

कुंभ : आज कुटुंबासह मनोरंजन आणि खरेदीत आनंददायी वेळ जाईल

Daily Horoscope
कुंभFile Photo

कुंभ : श्रीगणेश म्‍हणतात की, आज कुटुंबासह मनोरंजन आणि खरेदीत आनंददायी वेळ जाईल. तुम्ही घेतलेल्या कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयाचे कौतुक केले जाईल. आर्थिक दृष्टीकोनातून विशेष सकारात्मक परिणाम न मिळाल्‍याने चिडचिड आणि निराशा वाटेल. नातेवाईकांकडून कोणत्याही प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. पोटविकाराचा त्रास जाणवण्‍याची शक्‍यता.

मीन : योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास तुमच्या समस्या दूर होतील

Daily Horoscope
मीनFile Photo

मीन : श्रीगणेश सांगतात की, आज घर साफसफाई आणि इतर कामात वेळ जाईल, असे श्रीगणेश सांगतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास तुमच्या समस्या दूर होतील. शेजाऱ्यांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. इतर लोकांच्या कामात ढवळाढवळ करू नका. जवळच्या मित्राची अप्रिय बातमी मिळाल्याने मन उदास होईल. धोकादायक कामे टाळा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news