Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.
मेष : आज ज्येष्ठांच्या सहवासामुळे तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. कुटुंबात उत्सवाचे वातावरण राहील. तुमच्यावर अधिक जबाबदारी असेल. सर्व जबाबदारी स्वत:वर घेवू नका. अन्यथा तुमचे वैयक्तिक कामे प्रलंबित राहतील. राग टाळा. परिस्थिती शांततेने हाताळा. व्यवसायातील बहुतांश कामे मार्गी लागतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये योग्य समन्वय राखला जाईल. आरोग्य चांगले राहील.
वृषभ : जवळच्या नातेवाईकांच्या आगमनाने घरात आनंदाचे वातावरण राहील. जनसंपर्कात झालेली वृद्धी फायदेशीर ठरेल. मालमत्ते संबंधित कोणतेही काम आज पूर्ण होऊ शकते. तुमच्या भविष्यातील उपक्रमांची कोणाशीही चर्चा करू नका. अन्यथा याचा कोणीतरी गैरवापर घेवू शकते. कामाच्या ठिकाणी तुमची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करा. वैवाहिक जीवनातील छोट्या-मोठ्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. वातावरण बदलामुळे ॲलर्जीसारख्या तक्रारी उद्भवू शकतात.
मिथुन : आज कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. कोणताही बदल स्वीकारा, कारण हा बदल तुमच्यासाठी सकारात्मक असेल. भूतकाळातील नकारात्मक गोष्टी उगाळत बसू नका. कर्ज घेताना विचार करुनच निर्णय घ्या. पती-पत्नीचे नाते मधूर होईल.
कर्क : आज कुटुंबासोबत धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात वेळ व्यतित कराल. तुमची सकारात्मक वृत्ती कौटुंबिक समस्या सोडवण्यास मदत करेल. एखादे रखडलेले सरकारी काम आज पूर्ण होऊ शकते. मुलांची कोणतीही नकारात्मक क्रिया किंवा सहवास जाणून घेणे त्रासदायक ठरू शकते. समंजसपणाने विचार केल्यास तुम्हाला समस्येवर तोडगाही सापडेल. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. पती-पत्नीमध्ये मतभेद होवू शकतात. आरोग्य चांगले राहिल.
सिंह : आज तुम्ही तुमची कामे कार्यक्षमतेने पूर्ण करू शकाल. कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. गैरसमजामुळे जवळच्या मित्राशी संबंध खराब होऊ शकतात. कामातील व्यस्ततेमुळे तुम्हाला कुटुंबासाठी वेळ देता येणार नाही. अतिश्रम टाळा.
कन्या : आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या अनुकूल राहील. मेहनतीबाबत कोणतीही तडजोड करु नका. इतरांच्या सल्ल्याऐवजी स्वत:चे मत जावून घ्या. रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा नातेसंबंधांवर विपरीत परिणाम होईल. कामाच्या ठिकाणी कर्मचारी योग्य समन्वय ठेवतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहिल. पोटविकाराचा त्रास असणार्यांनी काळजी घ्यावी.
तूळ : आज तुमच्या कौशल्याच्या जोरावर तुम्ही अनेक महत्त्वाची कामे व्यवस्थितपणे पूर्ण करू शकाल. विरोधक ईर्षेपोटी तुमच्याविरुद्ध अफवा पसरवू शकतो. कोणतीही परिस्थिती शांततेने हाताळा. रागामुळे समस्या वाढू शकतात. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल. प्रकृती चांगली राहिल.
वृश्चिक : : ग्रहमान अनुकूल आहे. नवीन उपक्रमात यश मिळेल. नकारात्मक विचार टाळा. महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. कोणत्याही निर्णयावर जास्त वेळ घालवणे देखील यश मिळवू शकते. कार्यक्षेत्रातील कोणतीही समस्या शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. पती-पत्नीमध्ये योग्य समन्वय राखता येईल.
धनु : कुटुंबात सुव्यवस्था राखण्यासाठी केलेले नियम आनंददायी वातावरण निर्माण करेल. दीर्घकाळ सुरु असणार्या घरगुती समस्येवरही तोडगा निघू शकतो. घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याच्या समस्यांमुळे दिनचर्या व्यस्त राहिल. तुमच्या जोडीदाराचा भावनिक आधार तुम्हाला मजबूत ठेवेल. ॲसिडीटी आणि गॅसच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुमची दिनचर्या पाळणे गरजेचे आहे.
मकर : आज मालमत्ते संबंधित कोणतेही सरकारी कामात तुम्हाला यश मिळू शकते. गुंतवणुकीच्या कामांसाठीही दिवस अनुकूल आहे. इतरांच्या सल्ल्यापेक्षा स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. मालमत्तेची खरेदी-विक्रीवेळी अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. घराच्या व्यवस्थेबाबत पती-पत्नीमध्ये तणाव असू शकतो.
कुंभ : आज अचानक एखाद्या समस्येवर उपाय सापडल्याने तणावातून मुक्ती मिळेल. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यातही तुमचा सहभाग असेल. तुमच्या विचारात आणि व्यक्तिमत्त्वात सकारात्मक आणि संतुलित बदल घडवून आणू शकतो. अतिआत्मविश्वास टाळल्यास अनेक समस्या दूर होतील. तरुणांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करावे. उष्णताविकाराचा त्रास होवू शकतो.
मीन : आज तुमच्या कामांवर पूर्ण लक्ष केंद्रित करा. संवाद साधताना चुकीचे शब्दांचा वापर होणार नाही याची काळजी घ्या. थोडासा निष्काळजीपणाही तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेऊ शकतो. व्यवसायात तुमचा दबदबा कायम ठेवता येईल. कौटुंबीक वातावरण आंनदी राहील. आरोग्याची काळजी घ्या.