

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. आरोग्याची काळजी घ्या, महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांमध्ये घाई करणे टाळावे.
वृषभ : व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीचे नवे मार्ग उघडू शकतात. आर्थिक लाभशक्य. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल.
मिथुन : यश मिळवण्यासाठी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या अतिभारामुळे मानसिक ताण वाढू शकतो.
कर्क : निसर्गाची आणि ग्रहांची अनुकूल साथ लाभल्यामुळे तुमचे रखडलेले सर्व प्रश्न मार्गी लागतील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल.
सिंह : नोकरदारांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल. वरिष्ठांची मर्जी राखण्यात यश मिळेल आणि मेहनतीचे फळ पदरात पडेल.
कन्या : आज किरकोळ आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. कोणत्याही गुंतवणुकीचा निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
तूळ : नोकरीच्या ठिकाणी तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल. अडकलेला पैसा अचानक परत मिळण्याची दाट शक्यता आहे.
वृश्चिक : नवीन आणि चांगल्या संधी चालून येतील. नवीन व्यावसायिक करार करताना काळजीपूर्वक पावले उचलावीत.
धनू : विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रगतीचा आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळेल. रखडलेले जुने प्रकल्प पुन्हा सुरू होतील.
मकर : कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा. नोकरी बदलाचा विचार असल्यास तो काही काळासाठी पुढे ढकलणे योग्य राहील.
कुंभ : शनीच्या नक्षत्र बदलामुळे हा काळ अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरेल. प्रगतीच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील.
मीन : आरोग्यासंबंधित जुनाट तक्रारी दूर होऊन प्रकृतीत सुधारणा होईल. व्यवसायात पूर्वीपेक्षा अधिक स्थिरता पाहायला मिळेल.