

Horoscope
चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.
श्रीगणेश म्हणतात की, आज काही काळापासून चालत असलेल्या अडथळ्यांना दूर करण्यात तुम्हाला यश येईल. त्यामुळे स्वतःबद्दल आत्मसमाधानाची भावना निर्माण होईल. राजकीय व सामाजिक कार्यात विशेष योगदान राहील. आपल्या जवळच्या मित्राकडून फसवणुकीची शक्यता आहे, याची जाणीव ठेवा. युवकांनी करिअरकडे दुर्लक्ष केल्यास ते भविष्यासाठी घातक ठरू शकते. कामाच्या क्षेत्रात एखाद्या विशेष व्यक्तीशी भेट प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल. पती-पत्नीचे संबंध अधिक दृढ होतील.
श्रीगणेश सांगतात की, आज भूमी-संपत्ती व गुंतवणुकीसंबंधी कामांमध्ये व्यस्त राहू शकता. उत्कृष्ट बातमीही मिळू शकते. तुम्ही प्रत्येक कामात रस घेऊन ती उत्तम प्रकारे पार पाडाल. सर्वकाही ठीक असूनही मनात नकारात्मक विचार येऊ शकतो. निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ व्यतित करणे आणि आणि ध्यानधारणेमुळे मन:शांती लाभेल. युवकांनी करिअरसंबंधी कामांमध्ये अधिक लक्ष द्यावे. व्यवसायिक कामकाज वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.
मानसिकदृष्ट्या तुम्ही स्वतःला सक्षम वाटाल. व्यक्तिमत्त्व खुलवण्यासाठी विशेष लक्ष द्याल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेटीनंतर फायदेशीर योजना तयार होतील. आर्थिक बाबतीत कोणताही व्यवहार ठरवू नका. वाहन किंवा घराच्या दुरुस्तीवर जास्त खर्च झाल्यास बजेट बिघडू शकते. नातेवाईकांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. कुटुंबासोबत खरेदीत वेळ जाईल.
श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्ही कुटुबांसाठी वेळ द्याल. एखाद्या कामात चांगले यश मिळाल्याने उत्साह वाढेल. दिवसा थकवा जाणवणार नाही. स्पर्धात्मक क्षेत्रात यशाची उत्तम संधी आहे. करिअर आणि वैयक्तिक कामांमध्ये अहंकार अडथळा ठरू देऊ नका, अन्यथा केलेले काम बिघडू शकते. अती उतावळेपणा आणि उत्साहामुळे कोणाशी संबंध बिघडू शकतो, याची जाणीव ठेवा. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट व्यवसायासाठी फायदेशीर ठरू शकते. कौटुंबिक वातावरण गोड राहील. आरोग्य चांगले राहील.
आज नफ्याचे नवे मार्ग खुलतील. दीर्घकाळपासून असलेली चिंता दूर होईल. मन:शांती मिळेल. आर्थिक बाबतीतील ठाम व महत्त्वपूर्ण निर्णय यशस्वी ठरतील. प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालीकडे दुर्लक्ष करू नका. छोट्याशा गोष्टीवरून कोणाशी वाद होऊ शकतो, रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मुलांसोबत वेळ घालवून त्यांना तणावमुक्त करा, असा सल्ला श्रीगणेश देतात. पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणांवरुन मतभेदाची शक्य. तणावामुळे थकवा व अशक्तपणा जाणवू शकतो.
श्रीगणेश सांगतात की, आज अनपेक्षित यश मिळाल्याने मानसिक दिलासा मिळेल. वेळ महत्त्वाचा आहे, त्याचा योग्य वापर करा. नवीन घर किंवा संपत्ती खरेदीचा विचार करत असाल, तर तुमचा निर्णय योग्य ठरेल. कामाची अतिरिक्त जबाबदारी असेल. मेहनतीच्या तुलनेत परिणाम कमी मिळू शकतो. विद्यार्थ्यांचा वेळ विचार करण्यात जास्त जाऊ शकतो. महिला उद्योजक व्यवसायाकडे विशेष लक्ष देतील. पती-पत्नीचे संबंध गोड राहतील. पोटासंबंधी काही त्रास होऊ शकतो.
श्रीगणेश म्हणतात की, तुमच्या नम्र स्वभावामुळे वाईट संबंध सुधारण्यात यश मिळेल. सकारात्मक विचारांना तुम्ही कर्माची जोड दिल्यास चांगली संधी मिळेल. कुटुंबात एखाद्या लहान गोष्टीवरून गैरसमज होऊ शकतो. सध्या तुमचे एखादे गुपित उघड होऊ शकते. पती-पत्नीमध्ये अहंकारामुळे वाद होऊ शकतो. आरोग्य उत्तम राहील.
श्रीगणेश सांगतात की, भावनिकदृष्ट्या मजबूत राहाल. ज्ञानवर्धक व मनोरंजक गोष्टींत जाईल. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाण्याचा कार्यक्रम होईल. व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल जाणवेल. अचानक एखादी अडचण निर्माण होऊ शकते. समजूतदारपणाने व सावधगिरीने त्यावर मात कराल. नकारात्मक व्यक्तींशी संबंध असणे बदनामीचे कारण ठरू शकते, याची जाणीव ठेवा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आरोग्य उत्तम राहील.
श्रीगणेश म्हणतात की, धर्म-कर्म व आध्यात्मिक कार्यांमध्ये रस वाढेल. वाहन किंवा घराशी संबंधित कागदपत्रांची काळजी घ्या. एखाद्या विशिष्ट विषयाबद्दलची उत्सुकता तुमच्या मुख्य उद्दिष्टापासून दूर नेऊ शकते. कोणत्या तरी व्यवसायातील स्पर्धेमुळे नुकसान होऊ शकते. पती-पत्नीचे संबंध गोड होतील. आरोग्याची काळजी घ्या.
श्रीगणेश सांगतात की, आज दिनक्रम सुधारून तुमची विशेष कौशल्ये जागृत करण्यात वेळ जाईल. विशेषतः विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षांमध्ये यश मिळेल. खूप स्वकेंद्रित राहिल्याने वैयक्तिक व कौटुंबिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. धार्मिक उत्सवात गैरसमजुतीमुळे एखाद्याशी वाद होऊ शकतो. कामाच्या क्षेत्रात काही अडथळे येऊ शकतात. पती-पत्नीमध्ये मतभेद होऊ शकतात. आरोग्य उत्तम राहील.
श्रीगणेश म्हणतात की, मोठ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद तुमच्यावर राहील. गरजूंना मदत केल्याने समाधान मिळेल. कोणत्याही परिस्थितीत तुमच्या तत्त्वांशी तडजोड करू नका. भावंडांशी गोड संबंध ठेवा. विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चुकीच्या प्रवृत्तीकडे वळू शकतात, त्यामुळे अभ्यास पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात. मशीन किंवा तेलसंबंधी व्यवसाय फायदेशीर ठरेल. कामाच्या व्यस्ततेमुळे कुटुंबाकडे लक्ष देणे शक्य होणार नाही.
आज समजूतदारपणा आणि बुद्धिमत्तेमुळे कामे योग्य रीतीने पूर्ण करू शकाल. नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास मोठे यश मिळू शकते. मित्र किंवा पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासासंबंधी कोणतीही चुकीची कारणे देऊ नयेत. अन्नसंबंधी व्यवसाय हळूहळू स्थिर होत आहे. पती-पत्नीचे संबंध चांगले राहतील.