Rashi Bhavishya Today: 'या' राशींवर होणार लक्ष्मीची कृपा; व्यवसायात मिळणार भरपूर यश!आज तुमच्या राशीत काय आहे?

Horoscope 9 Jun 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. आनंददायी बातमी मिळेल.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : मनातील योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी चांगला दिवस. व्यवसायात अपेक्षित लाभ मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. प्रवासाचे योग.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : महत्त्वाच्या कामांत संयम आवश्यक आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. मित्रांचे सहकार्य मिळेल. अनावश्यक खर्च टाळा.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : आत्मविश्वास वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. संततीकडून समाधानकारक बातमी मिळेल. गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : कार्यक्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण राहील. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : नवीन संधींचा लाभ घेण्यासाठी सज्ज राहा. जमीन-जुमल्याच्या व्यवहारात लाभ संभवतो. मानसिक समाधान लाभेल.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : अनेक कामे सहज पूर्ण होतील. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रवासातून लाभ संभवतो.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : रागावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. आर्थिक स्थिती स्थिर राहील. धार्मिक कार्यात रुची वाढेल.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनू : भागीदारीत यश मिळेल. नोकरीत प्रगतीचे संकेत आहेत. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. आरोग्याची काळजी घ्या.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : दिवसभर व्यस्त राहाल; पण प्रयत्नांना यश मिळेल. कर्ज किंवा आर्थिक अडचणी कमी होतील. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : सर्जनशील कार्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी उत्साहवर्धक दिवस. प्रेमसंबंध दृढ होतील. मनःशांती आणि समाधान लाभेल.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : घरगुती कामांत लक्ष द्यावे लागेल. स्थावर मालमत्तेशी संबंधित निर्णय अनुकूल ठरतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news