

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : अन्य लोकांच्या यशाबद्दल कौतुक करत तुम्ही तो आनंद साजरा कराल. मागील उधारी चुकवलेली नसेल, तर त्यांना उधार देऊ नका.
वृषभ : अति खर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक टाळा. पालकांचे तसेच सासरकडील लोकांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : क्षणिक आवेगाने कोणताही निर्णय घेण्याची घाई करू नका. आपल्या मुलांसाठी ते त्रासदायक ठरू शकते. व्यापारात आज नफा होऊ शकतो.
कर्क : तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाऱ्या फुलासारखा दरवळेल. मित्र, नातेवाईक मदत करतील.
सिंह : भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर विचार करीत बसू नका. आज तुम्हाला भावूकतेने ग्रासले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल.
कन्या : आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड असेल. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल.
तूळ : दिवस लाभदायी असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. नवीन लोकांशी संपर्क होईल.
वृश्चिक : तरुणाईचा सहभाग असणा-या उपक्रमात स्वतः ला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. आजच्या दिवशी काळजी करू नका.
धनु : संयम बाळगा, आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे.
मकर : मित्रांच्या थंड प्रतिसादामुळे तुम्हाला ठेच लागू शकते, पण चित्त शांत ठेवा. आपत्ती टाळून मार्ग कसा काढता येईल, याचा विचार करा.
कुंभ : आज तब्येत उत्तम असेल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. आपल्या पुढील पिढीसाठी विशेष नियोजन करा.
मीन : समस्यांची सोडवणूक करण्यासाठी बुद्धिचातुर्य आणि डावपेच वापरा. कामातील दबावामुळे मानसिक अशांती वाढेल.