

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : लघु उद्योग करतात त्यांना आज जवळच्या लोकांचा मोलाचा सल्ला मिळू शकतो. ज्यामुळे आर्थिक लाभ ही मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ : प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. वेळेसोबत आपल्या व्यक्तींना वेळ देणे गरजेचे आहे. जोडीदाराची साथ मिळेल.
मिथुन : अति उत्साह आणि भयकारी महत्त्वाकांक्षा तुम्हाला चिंतेत टाकू शकते. हे टाळण्यासाठी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा.
कर्क : खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच भरपूर वेळ खर्च होईल. आज जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल. नातेवाईक भेटतील.
सिंह : घरात कोणतेही बदल करायचे असतील, तर घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या, अन्यथा त्यांचा रोष ओढवून घ्याल आणि आनंद गमावून बसाल.
कन्या : आयुष्यात इंटरेस्टिंग घडावे, याची दीर्घकाळापासून वाट पाहात असाल, तर आता नक्कीच आपणास थोडाफार रिलिफ मिळणार आहे.
तूळ : कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. कुणालाही पैसे देऊ नका.
वृश्चिक : महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुसऱ्यांच्या दडपणाखाली वावरू नका. आज आपल्यासाठी वेळ काढण्याची आवश्यकता आहे.
धनु : आज तुम्ही विनाकारण वादात अडकू शकता. तुमचा मूड खराब होईल. किमती वेळ वाया जाईल. आर्थिक व्यवहार आज टाळा.
मकर : अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचे आहे, हे जाणून घ्या. नव्या कल्पनांची परीक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे.
कुंभ : उत्पन्नाच्या मनाला पटतील अशा नवीन संकल्पनांचा लाभघ्या. आज सासरच्या पक्षाकडून काही वाईट वार्ता मिळू शकते.
मीन : आज एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक घटना घडतील, त्यामुळे तुम्ही गोंधळून आणि थकून जाल.