Rashi Bhavishya Today: वृषभ राशीला धनलाभ, कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना यश! जाणून घ्या तुमच्या राशीत काय आहे खास?

Horoscope 7 Jun 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : उत्साहवर्धक दिवस. कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुम्हाला आनंद देईल. कामाचा ताण विसरून स्वतःच्या छंदांसाठी वेळ काढा. आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : अनपेक्षित धनलाभ किंवा जुने येणे वसुलीची शक्यता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि संध्याकाळी मित्रांसोबत वेळ छान जाईल.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : तुमच्या संवाद कौशल्यामुळे अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे आठवणींना उजाळा मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : आज तुम्हाला मानसिक शांती आणि समाधान लाभेल. जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा किंवा लहान प्रवासाचा योग येऊ शकतो.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : आज रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. घाईघाईत घेतलेले निर्णय नुकसान करू शकतात. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरेल.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : विद्यार्थ्यांना आज स्पर्धात्मक परीक्षेत यश. नवीन योजनांवर विचार करण्यासाठी किंवा भविष्यातील आर्थिक नियोजन करण्यासाठी दिवस अत्यंत उत्तम आहे.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : गैरसमजातून वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवा. नवीन मोठी खरेदी किंवा आर्थिक गुंतवणूक आजच्या पुरती टाळलेली बरी.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : आत्मविश्वासात आणि कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होईल. एखादी आनंदाची बातमी मिळेल. ज्यामुळे मन प्रसन्न राहील. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनू : अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्याची नितांत गरज. कुटुंबातील सदस्यांसोबत घरगुती विषयांवर महत्त्वाची चर्चा होईल. हलका व्यायाम फायदेशीर राहील.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. नोकरी किंवा व्यवसायात काही नवीन आणि चांगल्या संधींबद्दल विचारमंथन करण्यासाठी आजचा वेळ योग्य आहे.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : आज तुमची रचनात्मक आणि कलात्मक बाजू समोर येईल. तुमच्या आवडत्या कलागुणांना वेळ द्या. प्रियजनांसोबत वेळ अत्यंत मजेत जाईल.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : आध्यात्मिक आणि सामाजिक कामात तुमचा रस वाढेल. यामुळे तुम्हाला मोठे मानसिक समाधान मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news