

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.
मेष : संयम ढळू देऊ नका, विशेषतः कठीण समयी नियंत्रण ठेवा. रात्रीच्या शक्यता. वेळी आज धन लाभ होण्याची पूर्ण
वृषभ : आज तुम्ही सफरीवर जाणार आहात. नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. उत्साहपूर्ण वातावरण असेल.
मिथुन : मौज, मस्ती, मजा आणि करमणुकीचा दिवस. पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. सकारात्मक विचार कराल.
कर्क : बरेच धनही खर्च होऊ शकते. घरगुती कामे कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारी असतील.
सिंह : कामामध्ये मयदिपलिकडे स्वतःला खेचू नका, योग्य ती विश्रांती घेण्याची आठवण ठेवा. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
कन्या : व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंदी असेल.
तूळ : मार्गदर्शन करण्याच्या भावनेतून सर्वांना मदत करा. त्यातूनच कौटुंबिक आयुष्यात आपोआप मधुर संबंध प्रस्थापित होतील.
वृश्चिक : कोणत्याही संकटावर मात करायची जोपर्यंत इच्छाशक्ती जबर आहे, तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही.
धनु : ध्यानधारणा आणि स्वत्वाची जाणीव होणे, हे लाभदायक सिद्ध होईल. अधिकचा पैसा स्थावर, जंगम मालमत्तेत गुंतवा.
मकर : कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. चुका माफ करून आणि आनंद देऊन जीवन जगाल.
कुंभ: आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता. अपेक्षेप्रमाणे काम न केल्यामुळे हाताखालच्या सहकाऱ्यांवर तुम्ही वैतागाल.
मीन : ज्येष्ठांनी त्यांच्या तब्येतीला जपून राहण्याची गरज. काही लोकांना आज चांगले धन लाभहोण्याची शक्यता.