

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : कामात उत्साह राहील, पण घाई टाळा. वरिष्ठांशी संवाद जपून करा. आर्थिक निर्णय सावधपणे घ्या. कुटुंबासोबत वेळ आनंद देईल.
वृषभ : स्थैर्य आणि समाधानाचा दिवस. नोकरी, व्यवसायात मेहनतीचे फळ मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्य ठीक राहील. थकवा जाणवेल.
मिथुन : नवीन कल्पना आणि योजना सुचतील. कामाच्या ठिकाणी बदलाची शक्यता आहे. मित्रांकडून सहकार्य मिळेल. खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा.
कर्क : भावनिक निर्णय टाळलेले बरे, घरगुती जबाबदाऱ्या वाढू शकतात, नोकरीत संयम ठेवणे आवश्यक आहे. संध्याकाळी मनःशांती मिळेल.
सिंह : नेतृत्वगुण आज उठून दिसतील. निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला. मान-प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता. अहंकार टाळल्यास नाती सुधारतील.
कन्या: कामात बारकावे महत्त्वाचे ठरतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, आर्थिक नियोजन योग्य ठरेल. घरात शांत वातावरण राहील.
तूळ : समतोल गरजेचा आहे. भागीदारीतील प्रश्न मिटू शकतील, कला, सर्जनशील कामात यश मिळेल. प्रिय व्यक्तीशी संवाद वाढेल.
वृश्चिकः आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढेल. जोखीम घेण्याआधी विचार करा. ध्यान किंवा योग लाभदायक ठरेल.
धनु : नवीन संधी चालून येतील, प्रवासाचे योग संभवतात. शिक्षण व अभ्यासात प्रगती होईल. खर्च वाढू शकतो, काळजी घ्या.
मकरः जबाबदाऱ्यांचा भार जाणवेल, कष्टाचे चीज होईल, संयम ठेवा. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. आरोग्यासाठी विश्रांती घ्या,
कुंभ : : नवीन ओळखी फायद्याच्या ठरतील. सामाजिक कामात सहभाग वाढेल, नोकरीत बदलाचे संकेत आहेत. विचार सकारात्मक ठेवा.
मीन : अंतर्मुख राहण्याची प्रवृत्ती वाढेल. कलात्मक कामात समाधान मिळेल. आर्थिक बाबतीत सावध राहा. कुटुंबाचा आधार मिळेल.