

मेष : माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज.
वृषभ : नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल. आज काहीतरी वेगळा अनुभव मिळेल.
मिथुन : वैरभावाचा त्याग करा. दुसऱ्यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. मित्र सल्ल्याची अपेक्षा धरतील.
कर्क : मानसिक ताण घेऊन काम करणे टाळा. कारण त्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येईल. पुरेशी विश्रांती घ्यायला विसरू नका.
सिंह : विद्यार्थी ज्या विषयात कमजोर आहे त्याबाबत गुरुजनांसोबत बोलू शकतात. गुरूंचा सल्ला त्या विषयाच्या खोलपर्यंत समजण्यात उपयुक्त ठरेल.
कन्या : प्रत्येक माणसाचे म्हणणे ऐका, कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही.
तूळ : आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे स्वप्ने प्रत्यक्षात येतील. पैसे मिळविण्याच्या नव्या संधी लाभदायक असतील.
वृश्चिक : गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तूची खरेदी संभवते.
धनु : तुम्ही काही किमती वस्तू हरवाल. कुटुंबातील सदस्यांसोबत संमेलन, एकत्रित कार्यक्रम केल्याने मूड चांगला बनेल.
मकर : घरात समस्या उद्भवू शकते. प्रिय व्यक्तीला समजून घ्या. व्यस्त दिनचर्येचा व्यतिरिक्त ही वेळ काढण्यात सक्षम व्हाल.
कुंभ : मानसिक शांती मिळेल. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. तुमच्या जोडीदाराची एक विस्मयकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल.
मीन : पुढील पिढीसाठी विशेष नियोजन करा. आखलेल्या योजना पार पाडू शकाल, उद्दिष्ट गाठू शकाल, अशा योजना हाती घ्या.