

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : आज तुम्ही सकारात्मक राहणार असल्यामुळे कामात नवे विचार सुचतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या.
वृषभ : आजच्या दिवशी आर्थिक बाबी तुम्हाला अनुकूल राहतील. कुटुंबात आनंदी वातावरण असेल; पण कोणताही निर्णय शांतपणे घ्या.
मिथुन : तुमच्याकडे असलेल्या संवाद कौशल्यामुळे फायदा होईल. नवीन ओळखी उपयुक्त ठरतील. अतिविचार टाळा.
कर्क : भावनिक स्थैर्य राखणे आवश्यक आहे. घरगुती कामे पूर्ण होतील. बऱ्याच दिवसांची जुनी अडचण सुटू शकते.
सिंह : आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तुमच्या अंगी असलेल्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा.
कन्या : कोणतेही काम घाईने करू नका. कामात बारकावे महत्त्वाचे ठरतील. आरोग्य सुधारेल. मित्रांकडून मदत मिळेल.
तूळ : आजचा दिवस संतुलन राखण्याचा आहे. भागीदारीत लाभसंभवतो. अनावश्यक वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक : तुमच्या गुप्त योजना यशस्वी होतील. मन मात्र स्थिर आणि एकाग्र ठेवा. विश्वासू व्यक्तींचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल.
धनु : आज तुमच्या बाबतीत प्रवासाचे योग संभवतात. तुम्हाला आयुष्यात नवीन संधी मिळू शकते. उत्साही स्वभाव कायम ठेवा.
मकर : तुम्ही केलेल्या कामाचे चीज होईल. त्याचे योग्य फळ मिळेल. स्वतःला आराम करण्यास वेळ द्या. कर्तव्यदक्षता दिसून येईल.
कुंभ : नवीन कल्पनांना चालना मिळेल. मोकळ्या वेळेमुळे सामाजिक संपर्क वाढतील. ताणतणाव टाळण्याचा प्रयत्न करा.
मीन : आज तुमची कल्पकता वाढेल. आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा ओढा वाढलेला असेल. महत्त्वाचा निर्णय पुढे ढकला.