

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात भागीदारीतून लाभ होईल.
वृषभ : रखडलेली कामे मार्गी लागतील. शनी देवाच्या कृपेने व्यवसायात धनलाभाचे योग. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल, कामाचे कौतुक होईल.
मिथुन : काही बाबतीत संयम राखणे अत्यंत आवश्यक आहे. नोकरीमध्ये कामाचा ताण वाढू शकतो. आज कोणाशीही वाद घालणे टाळा.
कर्क : भावनांवर नियंत्रण ठेवा. कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका. भावनिक होऊन घेतलेले निर्णय व्यवसायात नुकसानीचे ठरू शकतात.
सिंह : सामाजिक कार्यात मान-सन्मान मिळेल. नोकरीत व्यवस्थापन कौशल्यामुळे तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते.
कन्या : व्यावसायिक क्षेत्रात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होऊ शकतात. एखादे धार्मिक कार्य घरात नियोजित होऊ शकते.
तूळ : आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा राहील. मानसिक शांतता लाभेल; परंतु कामामध्ये काही अंशी सुस्ती जाणवू शकते.
वृश्चिक : आजचा दिवस काही आव्हाने घेऊन येऊ शकतो, पण तुमच्या जिद्दीच्या जोरावर त्यावर मात कराल. नोकरीत वरिष्ठांचे दडपण जाणवू शकते.
धनु : रखडलेली कामे पूर्ण झाल्याने मोठा दिलासा मिळेल. नोकरीत पदोन्नती किंवा पगारात वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
मकर : तुमच्या कामातील सातत्यामुळे कार्यक्षेत्रात तुमचे नाव होईल. व्यवसायात नवीन करार पूर्ण होऊ शकतात, भविष्यात मोठा नफा होईल.
कुंभ : द्विधा मनः स्थिती होऊ शकते. विचारपूर्वक पावले टाका. नोकरी करणाऱ्यांना कामाचा अतिरिक्त ताण जाणवेल.
मीन : तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे कठीण कामेही सोपी होतील. विद्यार्थ्यांना शिक्षणात आणि स्पर्धा परीक्षेत मोठे यश मिळण्याचे योग आहेत.