

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा.
वृषभ : प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे आज घातक होऊ शकते. जितके शक्य असेल तितके या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यापासून सावध राहा.
मिथुन : तुम्ही मागील काळात खूप पैसा खर्च केला आहे. ज्याचा परिणाम आज तुम्हाला भोगावा लागू शकतो.
कर्क : आर्थिक लाभहोण्याची शक्यता आहे. कुटुंब-मुले आणि मित्रमंडळी यांच्यासमवेत वेळ घालवल्याने मनाला पुन्हा एकदा उभारी मिळेल.
सिंह : आत्मविश्वास, अपेक्षांची जोड यामुळे आशा-आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय शुभ दिवस.
कन्या : कला क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरेल. बऱ्याच काळापासून वाट पाहात असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल.
तूळ : कामाबाबत आणि दृष्टीकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल.
वृश्चिक : जोडीदार अनुपस्थित असल्याची उणीव भासण्याची शक्यता आहे. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन.
धनु : दैनंदिन गरजा न भागविल्या गेल्यामुळे वैवाहिक आयुष्यात काहीसा तणाव निर्माण होईल. याचे कारण काहीही असू शकते.
मकर : तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना आत्मसात केलेले ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळीच धार देईल.
कुंभ : तुम्हाला गरज भासलीच, तर मित्र मदतीला धावून येतील. आजच्या सायंकाळी काहीतरी खास योजना आखा.
मीन : तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे कामानंतर विश्रांती घेण्यास वेळ मिळेल.