

मेष : आजचा दिवस खूपच सुंदर असेल. पराभव, अपयशातून काही धडे घ्याल. अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील.
वृषभ : घरातील कुणी सदस्य तुमच्यासमवेत प्रेमाशी निगडित काही समस्या शेअर करू शकतो. तुम्ही त्यांना योग्य सल्ला द्या.
मिथुन : तुम्ही आणि जोडीदारातील प्रेमसंबंध खराब होतील. परिस्थिती अधिक वाईट बनण्याच्या आधी मतभेद दूर करा.
कर्क : प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाल टिकणारा असेल. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल.
सिंह : आजच्या दिवशी काहीही करू नका. फक्त अस्तित्वाचा आनंद घ्या आणि कृतज्ञतेने राहा. जास्त पळापळ करू नका. दिवस आनंदात जाईल.
कन्या : लघुउद्योग करणाऱ्यांना जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो. त्यामुळे आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे.
तूळ : अनपेक्षित जबाबदारी आल्यामुळे योजना बारगळतील. स्वतः साठी काहीच करत नाही असे आढळेल. मन प्रसन्न राहील.
वृश्चिक : वातावरण चांगले आहे. परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या. बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा.
धनु : गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल.
मकर : रिकाम्या वेळेचा चांगला वापर करू शकता. वैवाहिक आयुष्याकडून आवस्तव अपेक्षा ठेवल्या तर दुःखी व्हाल.
कुंभ : समूह कार्यात सहभागी झाला तर नवीन मित्र भेटतील. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकता. कोणतीही कृती करताना विचारपूर्वक करा.
मीन : शिशिर ऋतूतील पानगळीप्रमाणे आपले प्रेम जीवन असू शकेल. आज तुम्हाला नात्याचे महत्त्व कळू शकते.