Horoscope 3 May 2026: मेष राशीच्या व्यक्तींची आज धावपळ, तर वृश्चिक राशीला धनलाभ; पाहा तुमच्या राशीत काय आहे?

Today Rashi Bhavishya in Marathi: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : आजचा दिवस धावपळीचा असेल. कौटुंबिक वादांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : रखडलेली कामे मार्गी लागतील. भौतिक सुखाच्या साधनांत वाढ होईल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. प्रवासाचे योग आहेत.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा दिवस आहे. आरोग्याकडे लक्ष द्या

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात प्रशंसा होईल. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. अचानक धनलाभाचे योग आहेत. जुन्या मित्रांची भेट झाल्यामुळे मन प्रसन्न राहील.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : समाजात मानसन्मान मिळेल. व्यवसायात नवीन भागीदारीचे प्रस्ताव येऊ शकतात. वडिलांच्या मार्गदर्शनामुळे कठीण प्रश्न सुटण्यास मदत होईल.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : तुमचा कल धार्मिक कार्याकडे राहील. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील. खर्चावर नियंत्रण ठेवा.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : कोणाशीही वाद घालू नका. कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे योगासने किंवा ध्यानधारणेसाठी वेळ काढा. नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवा.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : व्यावसायिकांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. नवीन प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीचे विचार मनात येतील. आरोग्य उत्तम राहील.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनु : शत्रूवर विजय मिळवाल. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे, कर्जाचे व्यवहार पूर्ण होतील. नोकरीत बढतीचे संकेत मिळू शकतात.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : बौद्धिक कामात प्रगती होईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. कला आणि साहित्य क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : कौटुंबिक बाबतीत थोडे संयमाने घ्यावे लागेल. जमीन-जुमल्याचे व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : तुमचा उत्साह वाढेल. भावंडांची मदत लाभेल. लहान प्रवास आनंददायी होतील. तुमच्या संवाद कौशल्यामुळे तुम्ही कठीण कामेही सहज पूर्ण कराल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news