

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : नवीन कल्पना अचानक सुचतील. कामात वेग वाढेल. जुन्या मित्रांकडून अनपेक्षित संदेश आनंद देईल. संध्याकाळी छंदासाठी वेळ काढा.
वृषभ : आर्थिक बाबतीत लहान निर्णय दूरगामी परिणाम देऊ शकतात. एखादा अपूर्ण विषय मार्गी लागेल. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा.
मिथुन : संवाद कौशल्यामुळे परिस्थिती सोपी होईल. नवीन ओळखीतून भविष्यातील संधी निर्माण होतील. दिवसभर उत्साह राहील. घाई टाळा.
कर्क : भावनापेक्षा तथ्यांवर भर देत योग्य निर्णय घ्याल. कामाच्या ठिकाणी तुमचे निरीक्षण कौतुकास पात्र ठरेल. जुन्या योजनेला आकार मिळेल.
सिंह : नेतृत्वगुण ठळकपणे दिसतील. इतरांना प्रेरणा देताना स्वतःच्या गरजांकडेही लक्ष द्या. मान-सन्मान वाढवणारी बातमी मिळू शकते.
कन्या : व्यवस्थित नियोजनाचा फायदा मिळेल. लहान अडचणींवर उपाय सापडतील. शिक्षणासाठी केलेला प्रयत्न फलदायी ठरेल.
तूळ : संतुलित विचारांमुळे मतभेद मिटवता येतील. सौदर्य, कला किंवा सर्जनशील कामांकडे ओढ वाढेल. भागीदारीत लाभ होईल.
वृश्चिक : गुप्त किंवा ॐ प्रलंबित विषयांवर प्रकाश पडू शकतो. धाडसी निर्णय घेण्याची वेळ आल्यास संयम राखा. स्वतःवर विश्वास ठेवा.
धनु : प्रवासाची किंवा नवीन अनुभवांची चर्चा रंगू शकते. दूरदृष्टीमुळे इतरांपेक्षा पुढचा विचार करता येईल. हास्यविनोदाने ताण निवळेल.
मकर : जबाबदाऱ्या वाढल्या तरी त्यातूनच प्रतिष्ठा मिळेल. वरिष्ठांचे लक्ष वेधून घ्याल. कौटुंबिक निर्णयात मत महत्त्वाचे ठरेल.
कुंभ : मित्रांसोबतचा संवाद प्रेरणादायी ठरेल. भविष्यासाठी आखलेली योजना एक पाऊल पुढे जाईल. मनातील शंका दूर होईल.
मीन : कल्पनाशक्ती आणि व्यवहार यांचा सुंदर मेळ घालता येईल. कलात्मक विषयांत रुची वाढेल. एखाद्या व्यक्तीची मदत स्मरणात राहील.