

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : कामात उत्साह राहील, पण घाईगडबड टाळा. वरिष्ठांशी बोलताना संयम ठेवा. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवाल.
वृषभ ः गुप्त योजना यशस्वी ठरू शकतात. कामात एकाग्रता वाढेल. कोणावरही अतिविश्वास ठेवू नका. मानसिक समाधान मिळेल.
मिथुन ः प्रवासाचे योग. नवीन शिकण्याच्या संधी मिळतील. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. आरोग्य समाधानकारक राहील.
कर्क ः भावनिकद़ृष्ट्या अस्थिर वाटू शकते. महत्त्वाचे निर्णय टाळा. घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. विश्रांती आवश्यक आहे.
सिंह ः कामात नेतृत्वगुण दिसून येतील. तुमचे मत इतरांना मान्य होईल. आर्थिक बाजू सुधारेल. अहंकार टाळल्यास दिवस उत्तम जाईल.
कन्या ः नियोजनबद्ध काम केल्यास यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या, थकवा जाणवू शकतो. सहकार्यांशी सहकार्य ठेवा. लहान गोष्टींवर ताण घेऊ नका.
तूळ ः दिवस समतोल राहील. नातेसंबंधात संवाद महत्त्वाचा ठरेल. कला किंवा सर्जनशील कामात मन रमेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक ः खर्च वाढू शकतो, त्यामुळे बजेट सांभाळा. आरोग्य ठीक राहील. जवळच्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडेल.
धनु ः नवीन ओळखी फायदेशीर ठरू शकतात. प्रवासाचे योग आहेत. विचारांमध्ये स्थैर्य ठेवण्याचा प्रयत्न करा. आरोग्याकडे लक्ष द्या.
मकर ः नवीन शिकण्याची संधी मिळेल. प्रवास किंवा शिक्षणाशी संबंधित कामे होतील. बोलण्यात स्पष्टता ठेवा.
कुंभ ः नवीन कल्पना सुचतील आणि उपयोगी ठरतील. मित्रांकडून मदत मिळेल. सामाजिक कामात सहभाग वाढेल. मन प्रसन्न राहील.
मीन ः अंतर्मुख होण्याचा दिवस आहे. सर्जनशील गोष्टींकडे ओढ वाढेल. खर्च करताना सावध रहा. झोप आणि आहार सांभाळा.